(नानीबाई चिखली /प्रतिनिधी )
खेळाच्या तासाला बॉल मिळाला नाही म्हणून किटलीचे टोपन घेवून खेळलो. टोपनाला लाथ मारली असता ते लागून मित्राचा दात पडला, मार चुकवायचा म्हणून इंग्रजी शब्द पाठांतर केले, शाळेत कधी व्यासपीठावर गेलो नाही मात्र शाळेतील संस्काराने आज एका संघटनेचा संस्थापक राज्याध्यक्ष म्हणून काम करतोय, शिक्षिका म्हणून काम करताना आलेला आत्मविश्वास हा शाळेत मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळेच अशा एक ना अनेक आठवणींना उजाळा देताना मुला मुलींना भरून आले. निमित्त होते आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचे. चिखली इंग्लिश स्कूल चिखली व जिजामाता गर्ल्सच्या सन 2002 व 2003 च्या विद्यार्थ्यांनी सुमारे 21 वर्षांनी एकत्र येत सस्नेह मेळाव्याचे आयोजन येथील शिव बसव सांस्कृतिक हॉलमध्ये केले होते. अध्यक्षस्थानी एस. बी. कुंभार होते.
यावेळी गणपती लोकरे, सात्ताप्पा कांबळे, आप्पासाहेब मुरगूडे, गिरीश गळतगे, रघुनाथ तळेकर, बाळासो भोसले, कुसूम गळतगे, कमल चौगुले, सुशीला बुरूड आदी सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झालेनंतर 21 वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांचे व्यक्तिमत्व बदलले होते. यावेळी चांगल्याच गप्पा रंगल्या.अनेकांनी तर शालेय जीवनातील आठवणींना पाढाच वाचला. यावेळी अंगणवाडी, कन्या शाळा, कुमार शाळा, चिखली हायस्कूल व जिजामाता गर्ल्स हायस्कूलमधील त्यावेळचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
सारिका फडके हिने प्रास्ताविक केले. शिवाजी कांबळे, संदेश संकपाळ, अनुराधा तूकान, दादासो चिखलीकर, विशाल चिखलीकर, रोहिणी गुरव, सन्मती शेट्टी, युवराज कुंभार आदी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी सुरेश मगदूम, शरद बोरवडेकर, संजय माने, उत्तम कुंभार, अशोक पाटील, संजय लोकरे, अनिल मगदूम, संजय घस्ती, अजित वाळके, दादासो वडगूले, विजया गडकरी उपस्थित होते. सागर मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. युवराज चव्हाण याने आभार मानले.