December 22, 2024

(कोल्हापूर / प्रतिनिधी )

गीत गाता चल च्या ‘आ देखे जरा,,किसमें कितना है दम,’, कार्यक्रमासाठी काल रसिकांनी अलोट गर्दी केली.शाहू स्मारक भवन मध्ये करावोके ट्रॅक वर पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गुप्तचर विभागाच्या अधीक्षिका मनीषा दुबुले, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील, एलआयसी विभागाचे ब्रँच मॅनेजर सूर्यकांत मोरे, तसेच विकास अधिकारी देवेंद्र इंगळे उपस्थित होते. मैफिलित मराठी हिंदी भाषेतील २५ गाणी सादर झालीत. कार्यक्रमासाठी शाहू स्मारक भवन प्रेक्षकाने खचाखच भरले होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक संजय मानके यांनी केले यामध्ये गीत गाता चल च्या आजवरच्या प्रवासाचे वर्णन केले.

कार्यक्रमाची सुरुवात संजय माणके व सृष्टी सावरे यांच्या ‘जाने जा ढूंढता फिर रहा’ या गीताने झाली. त्यानंतर सीमा वेर्णेकर, अशोक वेर्णेकर ,बिना अपराध ,मिलिंद दिवशीकर, रचना चवरे, सचिन मेहता, मोनाली ढवळे, युवराज दामूगडे, रमेश गंजाळ, शक्ती सारंग,वैशाली जाधव यांनी अजरामर हिंदी गीते सादर करून कार्यक्रमात रंग भरला.तर बीना अपराध आणि सीमा वेर्णेकर यांच्या ‘ हसता हुवा नुरानी चेहरा ‘ या गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, गुप्तचर विभागाच्या अधीक्षिका मनीषा दुबुले व अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणेचे अशोक पाटील यांनी गीते सादर करून हम भी किसीसे कम नही, हे दाखवून दिले. शैलेश जाधव, अरुण गुंजाळ, दीपक कुलकर्णी, डॉ. पल्लवी मोटे, डॉ. प्रसाद मोटे, विनायक चव्हाण ,भारती पाटील, पद्मिनी माने, वैशाली रेवणकर, राहुल मेहता यांनी आपल्या जादुई आवाजाने रसिकांना डोलायला लावले. कार्यक्रमाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत रसिकांना खेळवून ठेवले . संजय नलावडे यांची साऊंड सिस्टिम अफलातून होती. कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती संजय माणके व नेहा माणके यांची होती. अशोक पाटील यांनी निवेदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सुतार यांनी केले. कार्यक्रमासाठी आदित्य सुतार, किरण साखळकर ,शैलेश माने, यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *