December 22, 2024

  • (कागल / प्रतिनिधी)
    गौणखनिज करिता भाडे कराराने घेतलेली जमिन एन.ए. करण्यासाठी ६० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. प्रत्यक्षात २० हजार रूपयांची लाच स्विकारताना कागल तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून अश्विनी अतुल कारंडे ( वय ४६, रा. न्यू शाहूपपुरी कोल्हापूर ) यांना लचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून रंगेहाथ पकडले . या कारवाईमुळे तहसिल कार्यालयात एकच खळबळ उडाली . मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजता कागल तहसिल कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
    न्यू शाहूपुरीत राहणाऱ्या अश्विनी अतुल कारंडे या कागल तहसिल कार्यालयात अव्वल कारकून म्हणुन कार्यरत आहेत. गौण खनिज खरेदी विक्री व्यवसाय करण्यासाठी एका व्यावसायीकाने कागल तालुक्यात भाडे कराराने जमिन घेतली आहे . ही जमिन एन.ए. करण्यासाठी गुळ मालकाच्या नावाने तहसिल कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या जिमिनीच्या एन. ए. चे काम करून देण्यासाठी तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून अश्विनी अतुल कारंडे यांनी संबंधिताकडे ६० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती त्यापैकी ३० हजार रूपयांची रक्कम घेऊन येण्यास अश्विनी कारंडे यांनी संबंधित व्यावसायीकाला सांगितले. या व्याबसायीकाने कारंडे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागातील अधिकायांनी तक्रारीची खातरजमा केली .
  • त्याप्रमाणे मंगळवारी तहसिल कार्यालयात सापळा रचला. तहसिल कार्यालयात दुपारी सख्वा चार वाजता अश्विनी कारंडे ३० हजार रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकान्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले . त्यानंतर कारंडे यांना कागल पोलिस ठाण्यात आणण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरकार नाळे यांनी ही कारवाई केली. या कारवाई मुळे कागल तहसिल कार्यालयात एकच खळबळ उडाली.

  • अश्विनी कारंडे यांच्याबर कारवाई झाल्याचे समजताच तहसिल कार्यालयातील अनेक महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्षणात कार्यालय सोडले . काहींनी कार्यालयात कॅटिनमध्ये थांबून कारवाईची माहिती घेण्याचा प्रयल केला. तर काही महिला अधिकाऱ्यांनी आपल्या घरचा रस्ता धरला. या पथकात पोलिस निरीक्षक आस्मा मुल्ला, प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, सुधिर पाटील यांनी सहभाग घेतला. रात्री उशिरा या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात दाखल करण्याचे काम केले जात होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *