(बिद्री/प्रतिनिधी)
बोरवडे ग्रामपंचायत व बालाजी फराकटे युवा मंचच्या वतीने बोरवडे ( ता.कागल )येथे सरपंच जयश्री केदार फराकटे व ग्रामपंचायतीच्या सदस्या जयश्री बालाजी फराकटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सरपंच जयश्री फराकटे म्हणाल्या, बोरवडे ग्रामपंचायत व बालाजी फरकटे युवा मंचच्या वतीने 200 झाडे लावण्यात आली.
ही समाधानाची बाब आहे. येत्या काही दिवसात अजूनही 300 झाडे तलाव परिसरामध्ये लावण्यात येणार आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन महत्त्वाचे आहे. वृक्षारोपण करून मानवाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावेत.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य बालाजी फराकटे, केदार फराकटे, कृष्णात केसरकर, विशाल मगदूम, प्रकाश साठे, संतोष फराकटे,पांडुरंग फराकटे, सागर बलुगडे, संदीप साठे, रमेश कांबळे,सचिन कुंभार, अनिल बल्लाळ, नेताजी सूर्यवंशी,सूर्याजी साठे, सदाशिव परीट, प्रवीण फराकटे यांच्यासह बालाजी फराकटे युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. विशाल मगदूम यांनी प्रास्ताविक केले. कृष्णात केसरकर यांनी आभार मानले.