(तिटवे /प्रतिनिधी )
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहीद महाविद्यालय एनएसएस विभाग व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने
योगा दिन उत्साहात संपन्न झाला.
योग ही आपणास मिळालेली अमूल्य भेट असून आज सर्व जगाने योगाचे महत्त्व मानले आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी ॠषीमुनींनी प्राणायमांचा आविष्कार केला. ताण तणांवाचे प्राणायमाच्या माध्यमातून व्यवस्थापण करता येते. ध्यानधारणेतून मनुष्य जीवनाचे रहस्य, उद्देश जाणून घेता येतो असे मत पंचायत समिती राधानगरीचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेटे यांनी केले.
आनंद गुरव यांनी भारतीय योग परंपरा कशी श्रेष्ठ आहे, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रात्यक्षिक सत्रात मान, खांदे, कंबर, गुढगे आदींचे सूक्ष्म व्यायाम शिकवले व करवून घेतले. तसेच प्राणायाम, अनुलोम विलोम फुप्फुसाचे व्यायाम, सूर्यनमस्कार इत्यादींबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून घेतले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर यांनी केले. एनएसएस विभागाने या कार्यक्रमाचे समन्वयन केले. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी कांबळे यांनी केले तर आभार प्रा. स्वाती पोवार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती राधानगरीचे तालुका समूह संघटक के. डी. पाटील शिक्षकवृंद विद्यार्थीनी उपस्थित होत्या.