(गारगोटी /प्रतिनिधी)
त्रिमूर्ती संस्था समूहातील दूध संस्थेस 27 वर्ष व विकास सेवा संस्थेत सोळा वर्षे पूर्ण झाले असून या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून सभासदांचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यास आणि कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन त्रिमूर्ती संस्था समूहाची संस्थापक व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले .
त्रिमूर्ती संस्था समूहातील सर्व संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी ते बोलत होते .
यावेळी बोलताना श्री पाटील पुढे म्हणाले त्रिमूर्ती संस्था समूहने अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केलेला आहे संस्थेच्या सर्व सभासदांना योग्य त्या सोयी सुविधा आणि सवलती देण्यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध असतात संस्थेच्या सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जातातत्यामुळे या समूहातील सभासदांचा संस्थांवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे त्यामुळे सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून हा समूह कायमच कार्यरत राहील .
यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्रिमूर्ती संस्था समूहाच्या वतीने श्री नाथाजी पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . यावेळी त्रिमूर्ती विकास सेवा संस्थेच्या नवीन संगणकाचे आणि संगणक कक्षाचे उद्घाटन नाथाजी पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी त्रिमूर्ती दूध संस्थेच्या जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी श्री रविंद्र पाटील,सुरेश सुतार ,शामराव पाटील ,गजराज पाटील , पांडुरंग सारंग ,मोहन सूर्यवंशी ,सर्जेराव पाटील ,धनाजी कांबळे , रंगराव शेणवी , सुरेश पाटील , सागर कुपटे ,दिलीप शेनवी ,आनंदा कुंभार , महादेव कुंभार , युवराज लोहार ,आनंदा पवार ,बाळासाहेब हिरुगडे , दिनकर कुंभार ,बाजीराव कुंभार ,धनाजी कुंभार यांचे सह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .
स्वागत सचिव रमेश भोसले यांनी केले तर आभार सचिव सचिन शिंदे यांनी मानले .