(विशेष वृतसेवा/ समाधान म्हातुगडे)
कोण आल्याने आणि कोण गेल्याने भारतीय जनता पार्टीला काहीही फरक पडत नाही भारतीय जनता पार्टी काल ही उभी होती . आज ही उभी आहे आणि भविष्यातही उभीच राहील. बॅक फुटवर जाण्याचा प्रश्नच नाही, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले. भुदरगड तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते . भाजपाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ही भुदरगडची पहिलीच बैठक होती .
यावेळी बोलताना श्री.पाटील पुढे म्हणाले दोन खासदारांच्यावर सुरू झालेला भारतीय जनता पार्टीचा प्रवास आज आपण पाहत आहोत प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर भारतीय जनता पार्टी ही पाय रोवून उभी आहे . त्यामुळे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर या पक्षाची घोडदौड नेहमीच सुरू राहील .आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती पुन्हा सत्तेवर येणारच आहे त्यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल .महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील , खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भुदरगड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी निश्चितच यशस्वी होईल .
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या भुदरगड तालुक्यातील सदस्यता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला .
यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर प्रा . धनाजी मोरस्कर वसंतराव प्रभावळे विलासराव बेलेकर नामदेव चौगुले सुनिल तेली संतोष पाटील रणजीत आडके राहुल चौगुले बाजीराव देसाई भगवान शिंदे सुनील तेली सुनील पाटील निवास देसाई विनायक परुळेकर अशोक येलकर शक्तीजित पोवार, तुकाराम देसाई, ' अमोल पाटील विक्रम पवार सचिन देसाई अजित देसाई मोहन सूर्यवंशी सुरेश सुतार रमेश रायझादे एकनाथ पाटील शशीकांत पाटील अमर पाटील , के .बी . देसाई , सचिन हाळवणकर, युवराज पाटील, सुजन निंबाळकर अवधूत राणे विठ्ठल चौगुले अमृत गुरव शिवाजी रामाने पांडुरंग वायदंडे सचिन हळवणकर विनायक शिंदे संतोष बरकाळे सुरेश किल्लेदार मारुती बरकाळे जयराम कांबळे बाबुराव पिंगळे योगेश मुधाळकर मुस्तफा शेख लखन लोहार प्रवीण पाटील दीपक पाटील रामभाऊ पाटील वीरकुमार पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
२०१७ च्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अन्य पक्षातले कुणीही नेते मंडळी पार्टीत नसताना पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवावर भुदरगड तालुक्यामध्ये पार्टीने १३००० मते मिळवली व आकुर्डे पंचायत समिती मतदार संघात विजयाचा गुलाल उधळला यावेळी या पक्षात फक्त निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौजच होती. असेही नाथाजी पाटील म्हणाले.