(विषेश वृत्त/समाधान म्हातुगडे)
सध्याचे संगणकाचे युग आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळणे गरजेचे आहे. यासाठी राज्यात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे . यातून शाळामध्ये विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील २ हजार २९० प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या आहेत. प्रत्येक शाळेवर या संगणक प्रयोगशाळेसाठी एक इन्स्ट्रक्टर सुद्धा रुजू करण्यात आलेले आहे. आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल व ते शिकावं पण लागेल हे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईच्या राज्य प्रकल्प संचालक श्रीमती आर विमला यांनी आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) हा उपक्रम राबवत आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ शाळांमध्ये हा उपक्रम चालू असून आहे. यातून विद्यार्थ्यांना संगणक तज्ञ प्रशिक्षाकडून प्रशिक्षण दिले जात आहे.
विद्यार्थ्यांना आधुनिक प्रणालीची नवी ओळख करून देणारा अतिशय उकृष्ट प्रकारचा हा उपक्रम राबविला जात आहे. कोल्हापूर जिल्हा परीषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर व प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. अत्याधुनिक प्रणालीचे संगणकीय ज्ञान मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.