शहीद सिताराम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात
जागतिक फार्मासिस्ट डे उत्साहात
(तिटवे/ प्रतिनिधी)
मानवी जीवनाच्या निरोगी आरोग्याच्या दृष्टीने औषधनिर्माण शास्त्र अधिक प्रगत होत असून विद्यार्थ्यांनी यामधील सखोल ज्ञान प्राप्त करणे गरजेचे असल्याचे मत शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी शहीद सिताराम कॉलेज ऑफ फार्मसी
महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
ते पुढे म्हणाले जागतिकस्तरावर औषधनिर्माण शास्त्रात मोठे बदल घडत आहेत. बदलत्या काळानुसार यापुढील काळात ज्ञान व कौशल्ये विद्यार्थ्यानी आत्मसात करणे गरजेचे आहे. भविष्यातील या क्षेत्रातील गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांनी नाविण्यतेचा ध्यास घेवूनच वाटचाल करणे आवश्यक आहे.
भारत हा सर्वात जास्त तरुणांचा देश असल्याने विद्यार्थ्यांनी यश संपादन करत असताना जिद्द, चिकाटी, मेहनत करून ध्येय ठरवा अन् वाटचाल केल्यास यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन प्रा.अविनाश पालकर यांनी केले.
यावेळी शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सागर शेटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. अमिषा मुळीक,प्रा. आकांक्षा पाटणे, प्रा. प्रकाश माळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. स्नेहल माळी यांनी केले. सूत्रसंचालन भाग्यश्री महेकर, हर्षाली कांबळे यांनी केले.आभार साहिल पाटील यांनी केले.