(कोल्हापूर / समाधान म्हातुगडे) –
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साखरपट्ट्यात आलेलं अपयश म्हणून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. त्यासाठीच पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापुरात येत आहेत त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना शहा ‘चार्ज’ करणार आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महायुतीमधील ‘मोठा भाऊ’ होण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी, सहकारी बँका, दूध संघ आणि संस्था, शेती उत्पन्न बाजार समिती असं सहकाराचे जाळ पसरलेलं आहे. मात्र, गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाला हातपाय पसरण्यात अडचणी आल्या आहेत.