(मुरगूडः जोतिराम कुंभार )
शिवभक्त व हिंदू प्रेमींनी आज येथील शिवतीर्थावर शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी केली . भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
येथील नगरपालिकेसमोरील शिवतीर्थावर शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार प्रा सुनिल डेळेकर व पालिका अभियंता प्रकाश पोतदार यांच्याहस्ते करण्यात आले . व सर्वांनी एकत्रित क्रांतीवीर भगतसिंग यांना विनम्र अभिवादन केले .
याप्रसंगी शिवभक्त सर्जेराव भाट यांनी सर्वांचे स्वागत केले . तानाजी भराडे यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रमास मुरगूड नगरपालिकेचे जयवंत गोधडे ‘ रणजित निंबाळकर ‘ रवी माडेकर व दत्तात्रय कांबळे आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . संकेत शहा यांनी आभार मानले .