(मुरगूड / जोतीराम कुंभार)
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गेली अनेक वर्षे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे एकमेकांच्या महाविद्यालयात विचारांचे-ज्ञानाचे आदान प्रदान व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे अग्रणी महाविद्यालय योजना राबवत आहे. यानुसार देवचंद अग्रणी महाविद्यालय अंतर्गत 14 महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या मराठी विभागाची *व्यक्तिमत्व विकास व भाषिक कौशल्ये* या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी उत्साहात पार पडली.
व्यासपीठावर अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे, कॉमर्स विभागाचे प्रा. डॉ. उदयकुमार शिंदे, एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पांडुरंग सारंग, कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. डॉ. महादेव कोळी, दूध साखर महाविद्यालय, बिद्रीचे मराठी विभाग प्रमुख प्रा. वारके, कार्यशाळा समन्वयक प्रा. सुरेश दिवाण हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे उद्घाटन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते व इतर महाविद्यालयातून विद्यार्थी घेऊन आलेल्या प्राध्यापकांच्या हस्ते रोपट्यास आणि घालून करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सर्व अभ्यागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कार्यशाळा समन्वयक प्राध्यापक सुरेश दिवाण यांनी उपस्थितांसमोर प्रास्ताविक सादर केले.
अध्यक्ष भाषणात प्राचार्य डॉ. होडगे यांनी कार्यशाळेला हजर राहून भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व अभ्यासतांचे मनःपूर्वक स्वागत केले व कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. उद्घाटन समारंभाचे आभार प्रदर्शन हिंदी विभागाचे प्रा. डॉ. हणमंत सोहनी यांनी केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात भाषिक कौशल्य या विषयावर मंडलिक महाविद्यालयाचे इंग्रजीचे प्राध्यापक लेफ्टनंट विनोदकुमार प्रधान यांचा साधन व्यक्ती म्हणून डॉ. गुरूनाथ सामंत यांनी परिचय करून दिला. प्रा. प्रधान यांनी भाषेच्या विविध प्रकारापासून त्यातील कौशल्ये, वक्तृत्व, भाषण आणि वादविवाद इत्यादी मुद्द्यांवर दृकश्राव्य माध्यमातून सखोल माहिती दिली. या सत्राचे आभार प्रा. सौ. अर्चना कांबळे यांनी मानले.कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात व्यक्तिमत्व विकास या विषयाचे साधनव्यक्ती प्रा. डॉ. उदयकुमार शिंदे यांचा परिचय श्री. संजय हेरवाडे यांनी उपस्थितांना करून दिला.
डॉक्टर शिंदे यांनी व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, त्यासाठी आवश्यक घटक यांची प्रात्यक्षिक रूपाने सखोल माहिती सर्व सहभागीना करून दिली. या सत्राचे आभार प्रदर्शन भूगोल विभाग प्रमुख प्रा. दादासाहेब सरदेसाई यांनी केले.भोजन अवकाशानंतर समारोप समारंभाचे प्रास्ताविक कार्यशाळा समन्वयक प्रा. सुरेश दिवाण यांनी केले.
बिद्री महाविद्यालयाचे प्रा. डॉ .प्रदीप कांबळे, गारगोटी महाविद्यालयाचे प्रा. डांगे यांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या प्रातिनिधिक मनोगतामध्ये साधन व्यक्ती म्हणून आपल्या विषयांची मांडणी माहितीपूर्ण व मनोरंजक असल्याचे मत व्यक्त केले. सदरची कार्यशाळा यशस्वी झाल्याबद्दल महाविद्यालयाचे व आयोजकांचे आभार मानले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्र. प्राचार्य डॉ. होडगे यांनी सर्व उपस्थितांचे कार्यशाळेला प्राध्यापक स्वतः सोबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. होडगे व इतर मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. श्री संजय हेरवाडे यांनी सर्व उपस्थित त्यांचे संयोजक आयोजक यांचे व विद्यार्थी विद्यार्थिनींचे आभार मानून कार्यशाळा संपन्न झाल्याचे घोषित केले.सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापक वृंद महाविद्यालयाच्या एनसीसी चे विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सर्वांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.