( कोनवडे /प्रतिनिधी)
कोनवडे ता .भुदरगड येथील जयहिंद सहकार समुहाच्या वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातारणात संपन्न झाल्या . अध्यक्षस्थानी समूहाचे संस्थापक व भुदरगड तालुका संघाचे संचालक प्रा .हिंदुराव पाटील होते .
प्रारंभी स्वागत पी.के . पाटील यांनी केले .प्रास्ताविक प्रा . एच . आर .पाटील यांनी केले .विषय पत्रिकेचे वाचन सचिव एस. जी . पाटील व सचिव दयानंद पाटील यांनी केले .विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली .सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रा . एच .आर .पाटील, आनंदा पाटील , आनंदराव लोकरे ,सचिव संभाजी पाटील व दयानंद पाटील यांनी उत्तरे दिली . समूहाच्या वतीने डी .डी .पाटील यांची कूर केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल ,पी.के . पाटील यांची जीवन शिक्षण मंदिर मुरगुड या शाळेच्या मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल सौ .वनिता संजय पाटील यांची यमाई सेवा संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर रघुनाथ केरबा पाटील यांनी सोसायटीचे प्रथम कर्जफेड केल्याबद्दल सत्कार करण्यात आले .
यावेळी म्हैस व गाय उच्चांकी दूध पूरवठा करणाऱ्या सभासदांचे सत्कार करण्यात आले . यामध्ये पांडुरंग शामराव पाटील,प्रकाश दत्तात्रय , यशवंत दत्तात्रय लोकरे ,
दत्तात्रय विलास पाटील,सुहास शिवाजी पाटील ,
साताप्पा कृष्णा पाटील या सर्वांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले . तसेच १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले .
यावेळी श्री .जयहिंद सेवा संस्था , श्री .शिवभवानी दूध संस्था, श्री .जयहिंद दूध संस्था, श्री .हिराई दूध संस्था या सर्व संस्थांच्या सभा घेण्यात आल्या .चर्चेत पी .आय पाटील, लक्ष्मण पाटील, शाहूराजे भोसले, टी . एल .शिंदे , धनाजीराव शिंदे, वसंत पाटील, जयसिंग शिंदे ,सखाराम पाटील ,वाय .के .पाटील तुकाराम पाटील , ए . डी .पाटील, सुनिल पाटील , सर्जेराव पाटील ,एकनाथ पाटील ,तात्यासाहेब शिंदे ,रघुनाथ पाटील, तानाजी पाटील ,सुनील शिंदे यांनी भाग घेतला .सभेस सर्व संस्थांचे चेअरमन ,व्हाईस चेअरमन , संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते . आभार जयहिंद विकास संस्थेचे व्हा .चेअरमन रणजित पाटील यांनी मानले .