December 23, 2024

(मुरगूड/ जोतीराम कुंभार)

मुरगूड येथील एका शिक्षकाने कौटुंबिक वादातून शिक्षक पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून खून केला. आज सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली. या घटनेने मुरगूडमधे एकच खळबळ उडाली असून या घटनेची नोद मुरगूड पोलीसात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की येथील साई कॉलनीत राहत असलेल्या शिक्षक परशराम पांडूरंग लोकरे वय 53 यांचे आपली पत्नी सौ. सविता लोकरे वय 45 हिच्याशी कौंटुबिक कारणातून वारंवार भांडण होत होते. आज त्या भांडणाचे पर्यावसन खुणात झाले या दोघात वाद सुरु असताना त्यावेळी त्यांच्या मुलांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी वाद विकोपाला गेला शिक्षक पतीने राग अनावर झाल्याने वखंटा घेऊन सौ. पत्नी सविताच्या डोक्यात घातला यात त्या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. ही घटना सकाळी साडे नऊ च्या दरम्यान घडली या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात हलविला. अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनीही दुपारी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत. दरम्यान अपूर्वा परशराम लोकरे वय 25 हिने आपल्या आईच्या या दुर्दैवी घटने संबंधी मुरगूड पोलीसात फिर्याद दिली असून या घटनेची नोंद झाली आहे. शिक्षक पती परशराम पांडूरंग लोकरे वय 53 यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *