December 23, 2024

शिवाजी विद्यापीठाच्या शरण साहीत्य अध्यासनातून बसवेश्वरांच्या जीवनकार्य, विचारांचा प्रचार व प्रसार होणार

महात्मा बसवेश्वर स्वामी हे लोकशाही मूल्ये रुजवणारे महान संत

(कोल्हापूर / प्रतिनिधी)

शिवाजी विद्यापीठाच्या शरण साहित्य अध्यासनातून बसवेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा विचार प्रचार व प्रसार होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या अध्यासनासाठी जिल्हा नियोजन मंडळामध्ये एकूण तीन कोटी रुपये मंजूर निधी मंजूर आहे. त्यापैकी दीड कोटींची प्रशासकीय मान्यता पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांच्याकडे दिली. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठात महात्मा श्री. बसवेश्वर महाराज यांच्या जीवनाचा अभ्यास, त्यांचे विचार- कार्याचा प्रचार आणि प्रसारासाठी “शरण साहित्य अध्यासन” ला मंजुरी मिळाली. जिल्हा नियोजनकडून मंजूर तीन कोटी निधीपैकी दीड कोटी निधी तात्काळ वर्ग केला आहे.त्यानुसार आज दीड कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. शरण अध्यासनासाठीचा उर्वरित निधीही लवकरच प्रदान केला जाईल. तसेच; त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही श्री. मुश्रीफ यांनी दिली.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सर्वात आधी बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर स्वामी यांनी समता, न्याय, मूल्य, बंधुता, एकात्मता ही लोकशाही मूल्ये रुजवली. त्यांनी स्वातंत्र्य, अधिकार, नियंत्रण, शिस्त आणि प्रशासन, सुशासन या मूल्यांचाही पुरस्कार केला होता. श्री. मुश्रीफ म्हणाले, समतेचे प्रणेते, थोर समाज सुधारक आणि महान संत, असा त्यांचा लौकिक आहे. विजापूर जिल्ह्यात इंगळेश्वर- बागेवाडी येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून कृष्णा व मलप्रभा नद्यांच्या संगमावर असलेल्या कुडलसंगम येथे अध्ययन केंद्रात त्यांचे बारा वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म व तत्वज्ञानाचा अभ्यास केला. स्त्री- पुरुष भेदभाव, जातीभेद यासारख्या गोष्टींना त्यांनी कडाडून विरोध केला. ………………

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये महान संत, थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर स्वामी यांच्या जीवनकार्याच्या, विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी “शरण साहित्य अध्यासन” ला तीन कोटी निधीपैकी दीड कोटींची प्रशासकीय मान्यता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *