December 23, 2024

( बिद्री / प्रतिनिधी )

आपल्या पंचवीस वर्षांच्या आमदारकीच्या काळात बिद्री गावाला विकासनिधी देताना आपण नेहमीच झुकते माप दिले आहे. त्यामुळे गावचा विकासात्मक कायापालट झाला आहे. गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेवाचे भव्यदिव्य मंदिर लवकरच पूर्णत्वास जाईल. या मंदिरामुळे गावच्या लौकिकात भर पडेल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

बिद्री ( ता. कागल ) येथील श्री महादेव मंदिर व सांस्कृतिक हॉलसाठी ना. हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांतून १ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या मंदिराच्या पायाभरणी समारंभप्रसंगी ते बोलत होते. ना. मुश्रीफ म्हणाले, आपल्या मतदारसंघात आठशेहून अधिक मंदिरे उभा केली याचे मला समाधान आहे. यामुळेच माझी ओळख राज्यभरात मंदिरवालेबाबा म्हणून झाली आहे. आपण केलेले सत्कार्य आणि जनतेचे प्रेम हीच माझ्या आयुष्याची शिदोरी असून याच बळावर कोणतेही आव्हान परतवून लावण्याची हिंमत आपल्यात असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी बिद्रीचे संचालक मनोज फराकटे, रावसो खिल्लारी, माजी पं. स. सदस्य नंदकुमार पाटील, सरपंच पूजा पाटील, पांडुरंग पाटील, राजाराम चौगले, शिवाजी पाटील, पांडुरंग पाटील, गोपाळा पोवार, पांडुरंग चौगले, भाऊ पाटील, अनिल पाटील, नामदेव पाटील, तानाजी पाटील, राजेंद्र चौगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *