(मुरगुड /प्रतिनिधी )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभावीपणे राबवलेल्या केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मुरगूडसह परिसरातील सात गावांमध्ये 250 कोटी रुपयांचा निधी आला.अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
येथे सरपिराजीराव गुळ उत्पादक सोसायटीच्या सभागृहात मुरगुड परिसरातील भाजप कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
श्री.घाटगे पुढे म्हणाले,विशेष म्हणजे हा निधी लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर जमा झाला. त्यासाठी नागरिकांना कुणाच्या दारात हेलपाटे मारावे लागले नाहीत किंवा कुणाला कमिशनशी द्यावे लागले नाही.त्यांनी लाभार्थ्यांना पारदर्शकपणे थेट लाभ दिला. सर्वसामान्यांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविताना भ्रष्टाचारास पायबंद घातला.नरेंद्र मोदी व मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या दहा वर्षांच्या कालावधीची तुलना केल्यास जागतिक पातळीवर भारत देशाची पत मोदी यांच्या नेतृत्वामुळे वाढली. या जोरावर ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार यामध्ये कोणतीही शंका नाही
यावेळी सदा साखरचे संचालक संभाजी मोरे,माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके,माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले,रविंद्र ढेरे,राहूल खराडे,यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडिस,शाहूचे संचालक सुनिल मगदूम, संजय गांधी निराधार समिती सदस्य अमर चौगुले,यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष कोळेकर,विजय राजिगरे,रामभाऊ खराडे,सुधीर पाटोळे,सुहास खराडे,दिलीप कांबळे,सदाशिव गोधडे,शिवाजी चौगुले,किरण गवाणकर आदी उपस्थित होते.
स्वागत जिल्हा सरचिटणीस दगडू शेणवी यांनी केले.प्रास्तविक सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तामामा खराडे यांनी केले.आभार अनिल अर्जुने यांनी मानले.
समरजितराजेंच्या अभ्यासपूर्ण भाषणाने कार्यकर्ते मंत्रमुग्ध
सीएचे उच्च शिक्षण घेतलेले समरजितसिंह घाटगे यांनी गेल्या वीस वर्षातील काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंह व भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीतील विकास कामांचा लेखाजोखा आकडेवारीसह कार्यकर्त्यांसह मांडला. तो बुथप्रमुखांकरवी जनतेसमोर मांडण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने केवळ भाजपचेच नव्हे तर शिवसेनेचीही कार्यकर्ते मंत्रमुग्ध झाले.