December 23, 2024

(उत्तूर / प्रतिनिधी)

विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली. अवघ्या महिन्यावर मतदान येऊन ठेपले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ होऊ लागली आहे. अशा धावपळीतही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रस्त्यावर भाताची मळणी करणाऱ्या महिला भगिनींची थांबून भेट घेतली. नुसतीच त्यांनी भेट घेतली नाही तर, त्या भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही ? हे विचारायला सुद्धा ते विसरले नाहीत.

एका बाजूला निवडणुकीची धावपळ सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला गेल्या पंधरा दिवसापासून मेघराजा एकसारखा बरसत आहे. त्यामुळे बळीराजाही हैराण झाला आहे. पावसाने थोडी जरी उसंत दिली, तर लगेच शेतकरी तेवढ्याच वेळेत धावपळीत भाताची मळणी काढून घेताना दिसत आहे. आज असाच प्रसंग असताना आजरा तालुक्यातील मासेवाडी गावाजवळ धावपळीत भाताची मळणी करणाऱ्या महिला भगिनींची मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *