तिटवे /प्रतिनिधी
एस.एन.डी. टी महिला विद्यापीठामार्फत युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या पथनाट्य, मुकनाट्य, लघुनाट्य या संघाना तृतीय पारितोषिक मिळाले.
व्यक्तिगत प्रकारामध्ये समृध्दी पाटील ,अंकिता डवर या विद्यार्थीनींना वादविवाद कलाप्रकारात प्रथम पारितोषिक, ऋतुजा पाटील या विद्यार्थीनींना हिंदी निबंध लेखन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक, स्नेहा मगदूम या विद्यार्थीनींला हिंदी वकृत्वामध्ये दुसरा क्रमांक मिळाला.
युवा महोत्सवामध्ये विविध स्पर्धेमध्ये शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाने सहभाग नोंदवला होता. विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी यश संपादन केल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
या विद्यार्थीनींना शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, परीक्षक युवराज डवरी आदींचे मार्गदर्शन लाभले.