सोनाळी /प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ परत एकदा कागल तालुक्याचे लोकप्रिय आमदार व्हावेत यासाठी बेलवळे खुर्द गावातील सुमारे 450 ते 500 महिलांनी संकष्टी चतुर्थीचा योग साधून बेलवळे खुर्द पासून जवळजवळ 250 किलोमीटर जाऊन गणपतीपुळे येथील नवसाला पावणाऱ्या गणरायाला मुश्रीफ प्रचंड मतांनी निवडून यावेत म्हणून साकडे घातले.
बेलवळे खुर्द गावचे माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूरचे माजी चेअरमन दिनकरराव कोतेकर यांच्या सहकार्यातून व प्रयत्नातून जवळजवळ नऊ ते दहा एसटी बस मधून महिला गणपतीपुळे या ठिकाणी रवाना झाल्या होत्या. महिलांच्या मध्ये व अबालवृद्धांच्या मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सहलीच्या बसचे पूजन व उद्घाटन सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन व गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मुश्रीफ साहेबबाना तुम्ही आया बहिणीनी प्रचंड मतानी विजय करावे, असे भावनिक आव्हान केले.
यावेळी दिनकरराव कोतेकर व शहाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शामराव रामचंद्र पाटील, वसंत आबाजी पाटील, कृष्णात विष्णू पाटील, अभिजीत दिनकरराव कोतेकर, हिंदुराव शंकर पाटील, शंकर भाऊ पाटील, टी आर पाटील, ए के सावंत, एच डी सावंत, आनंदा राजाराम पाटील, जी डी जाधव, बाळकृष्ण पाटील, टी जी पाटील, तानाजी पाटील, साताप्पा मोरे, सुनील पाटील, प्रकाश कांबळे, सिद्धार्थ कांबळे, दत्तात्रय कांबळे, प्रकाश सावंत, शिवाजी पाटील, दत्तात्रय कोतेकर, गणेश पाटील, दिनकर पाटील, इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार काका पाटील यांनी मानले.



