तिटवे / प्रतिनिधी

एसएनडीटी महिला विद्यापीठाने विभागीय स्तरावर आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपल्या क्रीडा क्षेत्रातील कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले असून, त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला आहे.
ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात तनुजा संकपाळ या विद्यार्थिनीने रौप्य पदक मिळवले. सोबतच अमरावती येथे होणाऱ्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी कबड्डी स्पर्धेसाठी दिपाली धनवडे या विद्यार्थिनीची विद्यापीठ संघात निवड झाली आहे. तर हॉलीबॉल कोचिंग कॅम्प साठी सानिया पाटील या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. या सर्व विजेत्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि महाविद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर इंटर युनिव्हर्सिटी क्रीडा स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाचे नाव क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य ठरले आहे, इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेतही आपले स्थान पक्के करून आणखी मोठे यश मिळवतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
क्रीडा स्पर्धांसाठी संतोष फराकटे, अनिता अथने, प्रज्वल देवर्डेकर यांनी कष्ट घेतले असून विद्यार्थिनींच्या यशासाठी त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले आहे.



