माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, स्वराज्याच्या संरक्षणार्थ वीर शिवा काशीद यांनी बलिदान दिले
मतदारसंघातील नाभिक समाज बांधवांचा स्नेहमेळावा उत्साहात
(बामणी / प्रतिनिधी)
नाभिक समाज हा सेवाव्रत्ती समाज आहे. या समाजासाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांचे जीवनमान आणि राहणीमान उंचावू, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, हिंदवी स्वराज्याच्या संरक्षणार्थ वीर शिवा काशीद यांनी बलिदान दिले आहे.
बामणी ता. कागल येथे आर. के. मंगल कार्यालयात आयोजित कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील नाभिक समाजाच्या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे अध्यक्ष भगवानराव भिडवे होते.
या स्नेह मेळाव्याला समाज बांधव आणि भगिनींनी जोरदार प्रतिसाद दिला.मंत्री मुश्रीफ म्हणाले, नाभिक समाजाचे नाभिक समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्याच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला आहे. आपली जी काही कामे बाकी आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. आपल्या समाजाने नेहमीच माझी पाठराखण केली आहे. त्यामुळे आपले ऋण आपण कधीही विसरणार नाही. हामेळावा म्हणजेच आपल्या गोतावळ्याचे स्नेहसंमेलनच झाले आहे.माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, नाभिक समाजाने सेवाभावी वृत्तीने व्यवसायात आधुनिकता आणून आर्थिक उन्नती साधली आहे. आपल्या व्यवसायामुळे मानवी चेहऱ्याला सुंदरता प्राप्त झाली आहे. अखिल भारतीय नाभिक समाजाचे अध्यक्ष भगवान बिडवे म्हणाले, आजवर शासन दरबारी आपल्या समाजाचे अनेक प्रश्न व व्यथा मांडण्याची काम मंत्री हसन मुश्रीफ यांनीच केले आहे. सर्वसामान्य घटकांसाठी तळमळीने लढणारा नेता म्हणून आम्ही मंत्री मुश्रीफ यांच्याकडे पाहतो. इतर मागासवर्गीय समाजाचे महामंडळात रूपांतर करण्यासाठी मुश्रीफ यांनी प्रयत्न करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
नाभिक समाजाचे कौतुक करताना विजय काळे म्हणाले, प्राचीन काळात आधुनिक तंत्रज्ञान नसताना बेळगाव येथील नाभिक समाजाच्या वैज्ञाने परदेशी व्यक्तीवर शस्त्रक्रिया केली. पुढच्या काळात या वैद्याचा शोध घेऊन त्याचा सन्मान करण्यात आल्याचे संदर्भ आढळतात. ऐतिहासिक वारसा असलेला स्वाभिमानी नाभिक समाज आज जिद्द व चिकाटीने यशस्वी वाटचाल करीत आहे.स्वागत शिवाजी कमळकर यांनी केले. प्रास्ताविक साताप्पा माने यांनी केले. माधुरी शिंदे, विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील. केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर,धनराज घाटगे, सिद्धाराम गंगाधरे, सोनूसिंह घाटगे, कृष्णात सूर्यवंशी, सुरेश मर्दाने, अनिल संकपाळ, विलास संकपाळ, एम. के. संकपाळ आदी प्रमुख उपस्थित होते.
नाभिक समाजाला ऐतिहासिक परंपरामाजी आमदार संजय बाबा घाटगे म्हणाले, नाभिक समाजाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. या समाजातील शूरवीर शिवा काशिद यांचे मराठा साम्राज्याला फार मोठे योगदान लाभले आहे. त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरेल. …………….