कोल्हापूर / प्रतिनिधी
यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक पुढे म्हणाले, आमदार आबीटकर यांनी राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात आरोग्य, रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत सुविधां मार्गस्थ लावल्या आहेत. प्रलंबित प्रश्नांसाठी हजारो कोटी रूपयांचा निधी खेचून आणला आहे. राधानगरी मतदारसंघाच्या इतिहासात विकास झाला नाही इतका प्रचंड विकास आमदार आबिटकर यांनी केला आहे.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, महायुती शासनाने सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अनेक लोकहितवादी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे जनता महायुतीच्या पाठीमागे आहे. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले की, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून मतदार संघातील वाड्या-वस्यांदावर विकास गंगा पोहचलेली आहे. प्रत्येक माणसाच्या सुख-दुखात आमदार आबिटकर धावून गेले आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार के.पी.पाटील यांना 10 वर्षे जनतेचा विसर पडला होता. मात्र विधानसभेच्या निवडणूकीमुळे त्यांना आता जनता आठवू लागली आहे. ही जनताच त्यांना निवडणूकीमध्ये धडा शिकवणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील, उपजिल्हाध्यक्ष संभाजी आरडे, अलकेश कांदळकर, तालुकाध्यक्ष नामदेव चौगले, वसंतराव प्रभावळे, माजी उपसभापती रविश पाटील-कौलवकर, प्रा.राजेंद्र ठाकूर, लहूमामा जरग, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन देसाई, विजय महाडीक, मानसिंग पाटील, डॉ.सुभाष जाधव, व्ही.टी.जाधव, विलास रणदिवे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना खासदार धनंजय महाडीक सोबत माजी आमदार सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, आमदार प्रकाश आबिटकर आदी.