December 23, 2024

गारगोटी / प्रतिनिधी


राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जनता हेच माझं कुटुंब मानतो. मतदारसंघ आणि तुमच्या विकासासाठी अहोरात्र झटतो आहे. आपला मतदारसंघ राज्यातील प्रगत, सुंदर आणि देखणा मतदारसंघ करीत आहे. याकामी मला साथ द्या, असे भावनिक आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. पुणे येथे आयोजित कौटुंबिक स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास राधानगरी मतदारसंघातील पुण्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. उद्योगपती पी. टी. चौगले प्रमुख उपस्थित होते.

आमदार आबिटकर म्हणाले, माझ्या विजयात तुमची साथ महत्वाची आहे. कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणून तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करतोय. तुमच्या गावातील, भागातील विकासकामे, प्रगती तुम्ही पुण्यात राहून बघताय याचा मला अभिमान आहे. आजची तुमची उपस्थिती हे माझ्यावर असलेले प्रचंड प्रेम दाखवते. माझे काम अधिक गतिमान करण्यासाठी साथ द्या. आजपर्यंतचा तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या विजयासाठी महत्वाचा ठरला आहे. सर्व प्रश्न मार्गी लावून मतदारसंघाला पुढे नेणार आहे. दहा वर्षात केलेली विकासकामे आणि जनतेचे पाठबळ या जोरावर मी पुन्हा लढत आहे. यामुळे विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप याकडे बघायला मला वेळ नाही. माझा निकाल उंचाविण्यात पुणेकरांचा वाटा मोठा असेल. प्रत्येक जण माझ्या विजयासाठी झटतोय यातच माझा विजय आहे. विकासाचे व्हिजन घेऊन कामांची पूर्तता करून मी लढतोय. पुण्यातील मतदारसंघवासियांचे प्रश्न मार्गी लावू. मतदारसंघांचे नियोजन आणि व्हिजन घेऊन जातोय. लोकांना अभिप्रेत असलेले काम करतोय.

सखाराम रेडेकर म्हणाले, काम केली तर कायापालट होतो यासाठी आम्ही खरोखर भाग्यवान कि मतदारसंघाचे विकासातुन चित्र बदलत आहे.

रणजीत मगदुम म्हणाले, राज्यकर्ता कसा असावा, तर आमदार आबिटकरांसारखा. आमदार आबिटकर यांनी तळागाळातील प्रत्येक माणसांचा विकास केला.

यावेळी सौरभ पाटील म्हसवेकर, तेजस्विनी कांबळे यांची मनोगते झाली. यावेळी शामराव पत्ताडे, संजय गिरी, अरुण गृहदगे, साहेबराव नलगे, पांडुरंग पवार, शिवाजी पाटील, कोंडीबा पवार, तुकाराम खोत, बाळू फराकटे, अतुल पाटील, बाबू तोंडकर, शरद पाटील, आनंदा पाटील, पांडुरंग पाटील, अशोक देसाई, अनिल वारके, अनिल पाटील, विक्रम पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय वंडर यांनी केले. आभार अर्चना देसाई मानले.


अब की बार ….लाख पार
पुण्यातील सर्वाधीक मोठ्यात सांस्कृतिक हॉलमध्ये पुणे करांचा मेळावा आयोजित करण्यात आला दिपावली ची सणामुळे चाकरमानी गावाकडे जाण्याच्या गडबडीत असतानाही युवक,युवती मेळाव्यास गर्दी केली मेळाव्यात युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता त्यामुळे अब की बार लाख पार मताधिक्य देण्याच्या घोषणेने सभागृह दणाणून सोडले.

विरोधकांच्याकडे बघायला.
आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाऊण तासाच्या आपल्या घणाघाती भाषणात मतदार संघाच्या विकासाचा समर्पक लेखाजोखा मांडला,विशेष म्हणजे संपूर्ण भाषणात विरोधकांचे नाव सुध्दा घेतले नाही, आम्ही विकासकामांचा इतके गुंतून गेलो आहोत की विरोधकांच्या बघायला आम्हाला वेळच नाही आबीटकर यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

दोन्ही मेळाव्यांना उत्फुर्त प्रतिसाद
मतदारांच्या सोयीसाठी पुण्यात दोन ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवडमधील मेळावा सकाळी लवकर असुन मतदारसंघातील पुणेस्थित कुटुंबे मेळाव्यास उपस्थित होते. आबीटकरांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.

पुणे येथील मेळाव्यात बोलताना आमदार प्रकाश आबिटकर समोर उपस्थित जनसमुदाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *