(गडहिंग्लज/प्रतिनिधी)
गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, भाजपाचे गडहिंग्लज तालुका सरचिटणीस अजित जामदार, माजी ग्रामपंचायत सदस्य अभिजीत देसाई -मिणचेकर, सामाजिक कार्यकर्ते वसंत पाटील यांचा निर्धार
मुश्रीफ यांना भेटून दिल्या शुभेच्छा..
पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सर्वसामान्य जनतेचे कर्तबगार नेते आहेत. विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या मोठ्या मताधिक्यांच्या विजयासाठी महायुतीचा धर्म काटेकोर पाळणार असल्याचा निर्धार गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, भाजपाचे गडहिंग्लज तालुका सरचिटणीस अजित जामदार, माजी ग्रामपंचायत सदस्य अभिजीत देसाई -मिणचेकर, सामाजिक कार्यकर्ते वसंत पाटील यांनी व्यक्त केला. आज या सर्वांनी पालकमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची कागलमध्ये भेट घेऊन त्यांना मोठ्या मताधिक्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. श्री. मुश्रीफ यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले व हरेक परिस्थितीत खंबीरपणे आपणा सर्वांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही दिली.
……………..