December 23, 2024

गारगोटी / प्रतिनिधी


माझं सगळं आयुष्य मतदार सघासाठी समर्पित केले आहे. मतदारसंघाचा विविध माध्यमातून विकासाची घोडदौड सुरू असुन पर्यटन दृष्ट्या महाराष्ट्रात नव्हे तर देशातुन पर्यटक राधानगरी मतदारसंघ पहावयास येतील पण विरोधकांना विकास दिसत नाही, ते दहा वर्ष सत्तेत होते त्यांनी एक काम केलेले दाखवावे असे आवाहन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. मुंबई -नायगाव येथील यादव-गवळी समाज सभागृहात आयोजित भव्य मेळाव्यात ते बोलत होते, कार्यक्रमास बिद्री चे माजी संचालक नंदकिशोर सुर्यवंशी सरकार, दत्ताजीराव उगले, नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, बाबा नांदेकर प्रमुख उपस्थित होते.

आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले की, मतदार संघातील प्रत्येक प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भगीरथ सहकार्यामुळेच मतदार संघातील बहुतांशी प्रकल्पांना निधी मिळाला असुन संपूर्ण मतदार संघ पाणीदार झाला आहे. मतदार संघातील लोकांना तालुक्यात रोजगार 8 व्हावा याकरिता आपले प्रयत्न सुरू आहेत. तर वाडी-वस्त्यांवर रस्ते, वीजेच्या सोयीमुळे मुलभुत सुविधा उपलब्ध करण्यात यशस्वी झालो आहे. मुंबईतील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरे मुंबई शहरातच मिळण्यासाठी बैठका घेतल्या त्याचा सातत्यपुर्ण पाठपुरावा सुरू असून पुढील काळात गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरे उपलब्ध होणार आहेत. तसेच हॉटेल कामगारांचे स्वतंत्र महामंडळ व्हावे यासाठी पाठपुरावा केला असून ते महामंडळ मान्यतेच्या अंतिम टप्यात आहे. त्यामुळे इमारत बांधकाम महामंडळाच्या धर्तीवर सर्व सुविधा या हॉटेल कामगारांना उपलब्ध होणार आहेत. तसेच सुरक्षा महामंडळ अंतर्गत सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी देखील पाठपुरावा केला आहे. माझ्या विजयात तुमची साथ महत्वाची आहे. मतदार संघात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणून तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आजची तुमची उपस्थिती हे माझ्यावर असलेले प्रचंड प्रेम दाखवते. यापुढे देखील मतदार संघाच्या विकास अधिक गतिमान करण्यासाठी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांला काम करण्याची संधी द्या असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी दिपक पाटील (राशीवडे) म्हणाले, आमदार प्रकाश आबिटकर यांचे विकासात्तक काम पाहून माझं मत परिवर्तन झाले आहे. पै-पाहुण्यांच्या राजकारणाला राधानगरीची जनता कंटाळली असून येणाऱ्या निवडणूकीमध्ये आमदार आबिटकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 महाराष्ट्र यादव ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवडकर म्हणाले आमदार आबीटकर राज्यात उच्चांकी मतांनी विजयी होतील. गुरूनाथ दिवेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

  यावेळी प्रशांत भावके, जगन देसाई, कांता शेठ, विश्वास देसाई, बापूसाहेब चिले दीपक वरंडेकर, नामदेव पाटील मोहन पाटील उत्तम गोजारे, तुकाराम देसाई, सागर पाटील रमेश हिरुगडे राजेंद्र वरंडेकर विजय गुरव कृष्णा पाटील आदीसह मुंबईतील चाकरमानी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रदीप वरंडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप धम्मरक्षित यांनी केले. आभार उत्तम गोजारे यांनी मानले.


ये तो ट्रेलर है
पुणे, मुंबई येथील चाकरमानी यांच्या सभेतील ईर्षा, उत्साह आणि उच्चांकी गर्दी ही आबीटकर यांच्या विजयाची नांदी आहे. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! असे तुकाराम देसाई (मेघोलीकर) यांनी म्हणताच उपस्थितांनी शिट्या आणि टाळ्यांच्या गजराने सभागृह दणाणून सोडले.


मुंबईत जल्लोषी स्वागत
रविवार मुंबईत मेगा ब्लाँक होता त्यामुळे लांबलाबुन येणारे राधानगरी भुदरगड आजरा वासीय यांनी त्रासाचा कोणत्याही विचार न करता मेळाव्यास विक्रमी उपस्थिती लावली, आमदार आबीटकर येताच महिला लेझीम पथकासह सर्वानी जल्लोषी स्वागत केले विशेष म्हणजे रात्री आकरा पर्यंत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या रांग लागल्या होत्या.-

मुंबई येथील मेळाव्यात बोलताना आमदार प्रकाश आबीटकर, समोर उपस्थित जनसमुदाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *