तिटवे / प्रतिनिधी
एसएनडीटी महिला विद्यापीठाने विभागीय स्तरावर पुणे येथे आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या अंजली गोरे या विद्यार्थिनींने आपल्या क्रीडा क्षेत्रातील कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तायक्वांदोत तिने रौप्य पदक मिळविले आहे. तिच्या या यशामुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला आहे.
शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी अंजलीने उल्लेखनीय यश संपादन केल्यामुळे तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी अंजलीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशामुळे महाविद्यालयाचे नाव क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य ठरले आहे, या क्रीडा स्पर्धांसाठी संतोष फराकटे, अनिता अथने, प्रज्वल देवर्डेकर यांनी कष्ट घेतले असून विद्यार्थिनींच्या यशासाठी त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले आहे.