गोकुळ शिरगाव / प्रतिनिधी
येथील पंचक्रोशी मध्ये सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या मास्तर पाटील परिवाराने भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपणास नैतिक बळ दिले आहे, अशा नेमक्या शब्दात आपल्या भावना भाजपा नेते अमल महाडिक यांनी व्यक्त केला.
मास्तर पाटील परिवारातील ज्येष्ठ आणि भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी प्रमुख बाबूराव बापूसो पाटील यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले, सव्वाशे हुन चार पिढ्यातील – चार पिढ्या एकत्र असणाऱ्या मास्तर पाटील परिवाराचा हा ऋणानुबंध महाडिक परिवाराशी अधिक घटट झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी स्वरूप पाटील यांनी आपले भावपूर्ण मनोगत व्यक्त केले ते म्हणाले – राजकीय पदाच्या पलीकडे जाऊन आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत म्हणूनच अमल महाडिक आम्हाला आपलेसे वाटतात.
महादेव पाटील यांनी सर्वांचे आभार मानत अमल महाडिकाचा विजय पक्का असल्याचे सांगितले.
यावेळी पांडुरंग राजाराम पाटील, रामदास राजाराम पाटील, जनार्दन राजाराम पाटील, किरण राजाराम पाटील, रावसाहेब कृष्णात पाटी, राहुल रावसाहेब पाटील, कमलाकर बळवंत पाटील, अतुल पाटील यांच्यासह मास्तर पाटील परिवारातील आणि त्यांचा हितचिंतक मित्रपरिवार उपस्थित होता .
या मास्तर पाटील परिवाराच्या भाजपा प्रवेश आणि महाडिक यांना पाठिंबाच्या औपचारिक कार्यक्रमाची सर्वत्र पंचक्रोशी चर्चा होती.