(कागल / प्रतिनिधी)
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोरगरीब जनतेच्या चुलीपर्यंत विविध शासकीय योजना पोहचवल्या आहेत. तसेच कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघाचा केलेला चौफेर विकास केला आहे. या त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथील समरजित घाटगे गटातील युवा कार्यकर्त्यानी घाटगे गटाला राम राम करत मुश्रीफ गटात प्रवेश केला.
यावेळी युवा कार्यकर्ते निखिल पाटील, वैभव पाटील, प्रकाश उर्फ प्रताप पाटील, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, ओंकार पाटील, गजानन पाटील, दिग्विजय मेंगाणे, नेताजी पाटील, पलाश पाटील, एकनाथ पाटील, विठ्ठल पाटील, सिताराम पाटील, दत्तात्रय पाटील, तानाजी पाटील, साताप्पा पाटील, राहुल पाटील, संभाजी पाटील, महेश पाटील, सागर पाटील , अमित पाटील या तरुण कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला.