गारगोटी / प्रतिनीधी
नागणवाडी प्रकल्प मार्गस्थ लागल्यामुळे शेकडो एकर क्षेत्रावर हिरवं सोनं पिकू लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून उर आनंदाने भरून येत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते बारवे-दिंडेवाडी परिसरात झालेल्या जन आशिर्वाद यात्रेनिमित्त बोलत होते. यावेळी गावागावात लाडक्या बहिणींनी आमदार प्रकाश आबिटकर यांचे औक्षण करुन निवडणूकीत बहीणी पाठीशी असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, गेली कित्येक वर्षं नागणवाडी प्रकल्प रखडला होता. मात्र सातत्याने पाठपुरावा करून अथक परिश्रमानंतर हा प्रश्न मार्गस्थ लावला त्यामुळे शेकडो एकर कोरडवाहू शेती पाण्याखाली आली आहे. त्यामुळे हिरवं सोनं पिकविण्याचे शेतकऱ्यांच्या स्वप्न सत्यात उतरले आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन आनंदाने भरून येत आहे. लोकांसाठी चांगलं काम केलं की लोक डोक्यावर घेतात. ना मी कुणाला चिठ्ठी दिली ना नोकरी दिली तरी देखील अनेक तरुण माझ्यावर जीव ओवाळून टाकत आहेत. या लोकांच्या जीवावरच माझे समाजकारण व राजकारण सुरू आहे त्यामुळे निवडणूकीची मला चिंता नाही. हे लोकच माझ्या विजयाच्या पालखीचे भोई होतील असे सांगितले.
यावेळी बोलताना विद्याधर परीट म्हणाले, आमदार प्रकाश आबिटकर हे नागणवाडी प्रकल्पाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या मुळे या परिसरातील शेतकरी सुखी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आमदार आबिटकर यांच्या ठामपणे पाठीशी असल्याचे सांगितले.
यावेळी गोकुळचे माजी संचालक दौलतराव जाधव, पंचायत समिती माजी सभापती सुनिल निंबाळकर, सदस्य जयवंत चोरगे, माजी सरपंच श्रीधर भोईटे, जायसिंग सुतार, संभाजी राणे, विकास शिंदे, अजित राणे, रमेश शिंदे, मधुकर देवलकर, महादेव शिवगण, सचिन कांबळे, राजेंद्र भारमल, उत्तम धावडे, चिमाजी चिले, बळवंत चिले, रामचंद्र भारमल, विजय चिले, सुरेश भोसले, केशव चिले, संतोष धावडे, संभाजी चिले यांच्यासह प्रमुख मान्यवर व नागरीक उपस्थित होते.
बहिणी पाठीशी आहेत…
आमदार साहेब आपल्या प्रयत्नांमुळे आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिणींचे लाभार्थी 6 आहोत. ऐन दिवाळीच्या तोंडावर आम्हाला ७ हजार ५०० रूपयांची भाऊबीज मिळाली आहे. लाडक्या भावाच्या विजयाची पताका आम्ही खांद्यावर घेतली आहे असे सांगून अनेक महिला जन आशिर्वाद यात्रेत उत्स्फूर्तफणे सहभागी होत होत्या.