कुरूकली, / प्रतिनिधी
स्वर्गीय दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक गट आणि नामदार हसन मुश्रीफ गट यांच्यातील ऋणानुबंध अतूट आहेत, असे भावनिक उद्गार आर. डी. पाटील- कुरूकलीकर यांनी काढले. कै. मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण वाढलेलो आहोत, असेही ते म्हणाले.
कुरूकली, शिंदेवाडी, सुरुपली ता. कागल येथे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
श्री. आर. डी. पाटील पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा ही राजर्षी शाहू महाराज आणि दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पुरोगामी विचारांची भूमी आहे. हा पुरोगामित्वाचा आणि लोककल्याणाचा वारसा नामदार हसन मुश्रीफ समर्थपणे पुढे चालवीत आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या तीस ते पस्तीस वर्षाच्या राजकीय व सामाजिक जीवनात गटातटाच्या पलीकडे जाऊन काम केले. या काळात अनेक प्रसंग आले आणि गेले. पण कधीच कुणाशी दुश्मनी केली नाही. कागल तालुक्यातील गटबाजी संपवून सौहार्दाचे वातावरण कायम राहिल, यासाठीच प्रयत्न केले.
स्वागत व प्रास्ताविक कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केले. यावेळी बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, रंगराव पाटील, माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, बी. आर. पाटील, जयवंत पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदेवाडी येथे ॲड. जीवनराव शिंदे, वसंतराव शिंदे, रवी ढेरे, रवींद्र शिंदे, निलेश शिंदे उपस्थित होते. सुरूपली येथे बिद्री साखर चे संचालक आर. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.
पहाडासारखा माणूस…!
मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील म्हणाले, मंत्री हसनसाहेब मुश्रीफ हे विकासपुरुष आहेत. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी मानून नेहमी काम करतात. हसनसाहेबांच्यासारखा माणूस पहाडाप्रमाणे आमच्या मागे उभा असल्याने आम्हालाही काम करण्यासाठी हुरूप येतो…!
…………………
कुरूकली ता. कागल येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना आर. डी. पाटील, मंत्री हसन मुश्रीफ व समोर उपस्थित जनसमुदाय.
,