हसुर खुर्द / प्रतिनिधी
नागणवाडी प्रकल्प पूर्ण करूनच मतं मागायला येईन, असे मागील विधानसभा निवडणुकीवेळी वचन दिले होते. त्याप्रमाणे प्रकल्पाची वचनपूर्ती करूनच मतं मागायला आलो आहे. या विधानसभा निवडणुकीत मला आशीर्वाद द्या, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
हसूर खुर्दसह, हसूर बुद्रुक, कासारी येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे, उदयबाबा घोरपडे, शशिकांत खोत, सूर्याजी घोरपडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, नागणवाडी प्रकल्प पूर्ततेसाठी अनेक अडचणी आल्या. शेतकऱ्यांना चार एकराचा स्लॅब मान्य नव्हता. त्यामुळे शेतकरी कोर्टात गेले आणि प्रकल्प रखडला. पाटबंधारे खात्याची काही महिने जबाबदारी मिळाली. अखेरच्या टप्प्यात प्रकल्पग्रस्ताना जमिनी मिळाल्या नाहीत. म्हणून २८ लाखाचे पॅकेज दिल्यामुळे शेतकऱ्यांचे स्वेच्छा पुनर्वसन झाले. या प्रकल्पामुळे हसूर खुर्द, हसूर बुद्रुक, मांगनूर, कासारी गावच्या शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळू लागले. याचे मला आत्मिक समाधान मिळत आहे.
हसूर खुर्द येथे सरपंच सुभाष गडकरी,उपसरपंच सुभाष माने, अंकुश पाटील, ए. जी. साळोखे, आंनदा जाधव आदी उपस्थित होते. हसूर बुद्रुक येथे सरपंच शीतल लोहार, गिरीष कुलकर्णी, बाबुराव भोसले, रंगराव भोसले, ज्ञानदेव जाधव, दिग्विजय पाटील, मनोज वास्कर, पुरुषोत्तम साळोखे आदी उपस्थित होते. कासारी येथे माजी सरपंच तानाजी पाटील, सरपंच मन्सूर देसाई, धनाजीराव काटे, जयवंत पाटील, मधु नाईक आदी उपस्थित होते.
नारळ फोडलेली विकासकामे गेली कुठे…?
हसूर खुर्दचे माजी सरपंच अंकुश पाटील म्हणाले, कोणत्याही प्रकारचे विकासकाम नसलेल्या समरजीत घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी गल्ली-बोळातील अपप्रचार थांबऊन बिळातून बाहेर पडावे… काहीही काम नसताना गाजावाजा करून चौकात नारळ फोडलेली विकास कामे कुठे गेली? याचे पहिल्यांदा उत्तर द्यावे आणि मगच मंत्री मुश्रीफ यांच्यावर बोलावे, असे आव्हान दिले.