सेनापती कापशी/ प्रतिनिधी
आजपर्यंत जनतेने मला संधी दिली म्हणून माझ्या हातून ७५० देवालयांचा जीर्णोद्धार करण्याचे भाग्य मिळाले. कामगार खात्याच्या माध्यमातून मतदारसंघात बांधकाम कामगारांच्या मुलांना ४८ कोटी रुपये शिष्यवृत्ती मिळाली. अशा विकासकामाच्या जोरावर गोरगरीबांची सेवा करण्याची संधी मिळाली. परंतु; मला तुरुंगात टाकून आणि कुटुंबीयांना छळून स्वतः आमदार होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या खलनायकी प्रवृत्तीला हद्दपार करूया, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
चिकोत्रा खोऱ्यातील आलाबादसह, अर्जुनवाडा, नंद्याळ, तमनाकवाडा येथील प्रचारदौऱ्यात ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, चिकोत्रा, नागणवाडी, आंबेओहळ प्रकल्पाचा पाठपुरावा केला. त्यामुळे पाण्यावाचून वंचित असणाऱ्या गावांना कायमस्वरूपी पाण्याची सोय झाली. चिकोत्रा खोऱ्यात हिरवाई आणल्याचे मला समाधान वाटत आहे. येथून पुढेही जनतेची सेवा करण्याची मला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
अंबरीशसिंह घाटगे म्हणाले, संजयबाबा घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याशी संघर्ष केला. पण त्यामध्ये व्यक्तीगत कटुता अजिबात नव्हती. मात्र समरजित घाटगे यांनी ईडीचा ससेमिरा लावला. घरातील महिलांना त्रास देऊन आमदार होण्याच्या या राक्षसी महत्वाकांक्षी प्रवृत्तीला रोखले पाहिजे.
मधुकर करडे म्हणाले, समरजित घाटगे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांची अडचण कधीच समजून घेतली नाही. ऊस तोडीत फार मोठा दुजाभाव केला जातो. गावातल्या माणसाला घेऊन गेल्याशिवाय काम होत नाही…
दातृत्व असावे तर मुश्रीफसाहेबांसारखे…
अर्जुनवाडाचे माजी सरपंच प्रदीप पाटील म्हणाले, अर्जुनवाडा गावातील मुले राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी जात होती. त्यावेळी आर्थिक अडचण आली. तेव्हा खेळाडूंना खेळाचे साहित्य व प्रवास खर्चासाठी ४५ हजार रुपये दिले. त्यावेळी आमचे उर भरून आले. म्हणूनच मुश्रीफसाहेबांच्यासारखे दातृत्व मी तरी पाहिले नाही.
आलाबाद येथे जोती मुसळे, सरपंच लताताई कांबळे, संतोष खराडे, एकनाथ कामते, तौफिक देसाई, ईश्वरा चौगले, सिद्धाप्पा गोरे, आनंदा सरवडे, तानाजी कामते आउदी उपस्थित होते. तमनाकवाडा येथे सरपंच रंजना चौगले, उपसरपंच आक्काताई तिप्पे, डी. आर. चौगले, शिवाजी तिप्पे, दत्तात्रय चौगले, सौरभ तिप्पे, संजय चौगले, दयानंद साळवी, आदी उपस्थित होते.
अर्जुनवाडा येथे बळीराम कुंभार, माजी सरपंच प्रदीप पाटील, अजित पाटील, भारत सातवेकर, आर. के. लाडगावकर, विशाल कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. नंद्याळ येथे बाबुराव अस्वले, मधुकर करडे,
हरूण देसाई, आर. डी. पाटील, रवींद्र येजरे, पंढरीनाथ पाटील, अण्णासो आडेकर, विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच मनीषा कांबळे, दिलीप पाटील, संजय पाटील, मधुकर सुतार, संजय शिंदे आदी उपस्थित होते.