December 23, 2024

कागल/प्रतिनिधी

कागल विधानसभा मतदारसंघ संघातील बहुतांशी युवकांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे ओढ वाढली आहे. देशात महायुतीचे सरकार असल्याने पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येवून विकासत्मक कामे होणे गरजेचे आहे, यासाठी आम्ही महायुतीला साथ देणार असल्याचे भावना युवा वर्गातून व्यक्त होत आहेत. हळदवडे (ता. कागल) येथील युवकांनी समरजीत घाटगे गटाला कंटाळून हसन मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला.

यामध्ये रत्नदीप लाड, नामदेव आरागडे, नामदेव सुतार, प्रितम सुतार, उत्तम लाड, स्वप्निल भराडे, आकाश अस्वले, किरण खवरे, समाधान साबळे, उदय बैलकर व संजय आरागडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ व नविद मुश्रीफ यांना प्रत्यक्ष भेटून जाहीर पाठिंबा देत मुश्रीफ गटात प्रवेश केला.

ज्या विश्वासाच्या भावनेने मुश्रीफ गटात प्रवेश केली आहे, त्या विश्वासाला तड़ा आम्ही जाऊ देणार नाही. या युवकांचे, कुटूंबीय व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन.

यावेळी भडगावचे सरपंच बी. एम. पाटील, संजय भराडे व प्रमोद चौगले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *