: उत्तूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा
(विशेष वृत्त / समाधान म्हातुगडे )
उत्तूर परिसरासह कागल मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी व समरजितसिंह घाटगे खांद्याला खांदा लावून काम करू.अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी दिली.उत्तूर(ता.आजरा)येथे त्यांच्या प्रचारार्थ भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
रखडलेला आंबेओहोळ प्रकल्प राजेंमुळे पुर्णत्वास
उत्तूर परिसरास वरदान ठरलेला आंबेओहळ प्रकल्प निधी अभावी रखडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून राजे समरजितसिंह घाटगे यांनी 227 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला.निधीअभावी रेंगाळलेला हा प्रकल्प राजेंच्यामुळे पुर्णत्वास गेला.त्यामुळे गेली दोन वर्षे या धरणात पाणी साठा होत आहे. असे प्रतिपादन यावेळी संजय धुरे यांनी केले.
अध्यक्षस्थानी शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे होते.
खासदार मंडलिक पुढे म्हणाले,गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर लोकसभा मतदार संघात आठशे कोटींची विकासकामे पूर्ण केली आहेत.विकासकामांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्यावर मोठा अन्याय झाला.मात्र महायुतीच्या सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच या मतदारसंघात विकासकामे मार्गी लागली.
अध्यक्षीय मनोगतात राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर अनेक देशांची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली.मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत होऊन विकास दर वाढला. त्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर, काश्मीरमधील 370 कलमसारखे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले. जागतिक पातळीवर महासत्ता म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. मोदींचे नेतृत्व मजबूत करण्यासाठी संजय मंडलिक यांना निवडून देऊया.
यावेळी सरचिटणीस आतिषकुमार संजय गांधी निराधार समितीचे सदस्य विठ्ठल उत्तूरकर,संजय धुरे,नितेश महाराज रायकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी संदेश रायकर,श्रीपतराव यादव,सदानंद व्हनबट्टे,धोंडीराम सावंत,राजे बॅंकेचे संचालक रविद्र घोरपडे,जनार्दन निऊंगरे, सूर्यकांत पाटील,प्रविण लोकरे, ज्योतिबा नाधवडेकर यांच्यासह भाजपाच्या विविध सेलचे पदाधिकारी,बुथ प्रमुख,सोशल मिडीया प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वागत मंदार हळवणकर यांनी केले.प्रास्ताविक संजय गांधी निराधार समितीचे सदस्य विठ्ठल उत्तूरकर यांनी केले. आभार प्रदीप लोकरे यांनी मानले.
छायाचित्र-उत्तूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना महायुतीचे उमेदवार खास.संजय मंडलिक, व्यासपिठावर शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे व इतर मान्यवर.