(कोल्हापूर/ प्रतिनिधी)
गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी काही दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतल्याची घोषणा केलीय. तसंच त्यांनी या निवडणुकीत अद्याप आपण कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचं स्पष्ट केले नसले तरीही महायुतीला पाठींबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.