कोल्हापूर / प्रतिनिधी
गत विधानसभा सभागृहात भाजपचे एकही आमदार नव्हते. काँग्रेस -महाविकास आघाडी चे नेते नेहमी यावेळी सुद्धा भाजप मुक्त कोल्हापूर करणार म्हणून वल्गना करत होते.मात्र स्वाभिमानी जनतेने भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या विकास कामांवर, व्हिजन वर विश्वास ठेवून व लाडक्या बहिणींनी दिलेल्या भरघोस सहकार्याने ऐतिहासिक विजय मिळवत कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस तथा महाविकास आघाडीच हद्दपार केली म्हणूनच १०-० ने काँग्रेस मुक्त कोल्हापूर केले , जिल्हयातील मतदारांनी महायुतीला साथ दिल्याचे समाधान असल्याच्या भावना भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना नाथाजी पाटील म्हणाले, माझी कोल्हापूर जिल्ह्याच्या भाजपचा जिल्हाध्यक्षपदी निवड झालेनतर संपूर्ण जिल्हाभर कानाकोपऱ्यामध्ये प्रवास केला . भारतीय जनता पार्टीच्या संघटनेबरोबरच महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करण्यासाठी अहोरात्र काम केलं आणि याचाच परिपाक म्हणून आज महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार या जिल्ह्यांमध्ये विजयी झाल्याचे दिसून येत आहे.
खरंतर या महायुती सरकारने राज्यामध्ये केलेल्या विकासाचे काम, शेतकऱ्यांच्यासाठी केलेली मोफत वीज योजना, किसान सन्मान योजना,युवकांच्यासाठी केलेल्या विविध योजना ' विद्यार्थ्यांनींना मोफत शिक्षण आणि विशेषतः लाडक्या बहिणीसाठी आणलेली योजना, लाडक्या बहिणीं या विजयाच्या शिल्पकार बनल्या असून या योजनांमुळे महायुतीच्या सरकारवरचा विश्वास वाढला आहे. हे सरकार कामाचे आहे असा विश्वास ज्यावेळी जनतेच्या मनामध्ये जागृत झाला त्यावेळी जनतेने महायुतीच्या सरकारच्या बाजूने निकाल दिला. गेल्या अनेक वर्षाच्या कालावधीमध्ये कोणत्याही सरकारला मिळालेला नाही इतका मोठा जनादेश या निकालाने मिळालेला आहे . कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या निवडून आल्याने मोठ्या विजयाच्या वल्गना करणाऱ्या नेत्यांच्या मुळे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा सुपडासाफ झाल्याचे चित्र आपल्या सर्वांना दिसून येते. हा विजय कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे असेच या निमित्ताने मला म्हणाव असे वाटते .
या निवडणुकीच्या यशात सहकार्य केल्याबद्दल माता भगिनी ,युवक, जेष्ठ नागरिक ,जागृत मतदार यांच्या बरोबर भाजपसह सर्वच पक्षांचे- गटांचे मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार यांचे मनःपूर्वक आभारही नाथाजी पाटील यांनी मांडले.