December 22, 2024

(नवी दिल्ली / प्रतिनिधी)

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री ना.जे.पी.नड्डा यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी संसद भवन येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.येत्या दि.5 डीसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या महायुती सरकारच्या
शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर हि भेट राजकीय दृट्या अत्यंत महत्वाची ठरली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या वाढदिवसानिमित्त आज ना.रामदास आठवले यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकित महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याबद्दल ना.रामदास आठवले यांनी जे पी.नड्डा यांचे अभिनंदन केले.काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाविकास आघाडी ने लोकसभेत संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला होता.तो प्रचार विधानसभा निवडणुकीत चालला नाही.काँग्रेसचे पितळ उघडे पडले. महाविकास आघाडी चा खोटा प्रचार
चालला नाही.महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेने महायुतीला भरभरुन मतदान केले.त्यामुळे महायुतीचा प्रचंड विजय झाल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी जे.पि.नड्डा यांना दिली.महायुती सरकार स्थापन करताना शिवसेनेचे नेते काळजीवाहु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुतीच्या समन्वय समीतीचे प्रमुख पद देऊन त्यांची नाराजी दुर करावी.अशी सुचना ना.रामदास आठवले यांनी केली.
.यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे नाराज नसुन महायुतीचे सरकार भाजपच्या नेतृत्वात स्थापन करण्यात अनुकुल असल्याचे जे.पी.नड्डा यांनी सांगीतले.
महायुती सरकरा मजबुत आणि अभेद्य राहण्यासाठी एकनाथ शिंदे यांना महायुतीचा अविभाज्य घटक करणे आवश्यक आहे .एकनाथ शिंदेशिवाय महायुती सरकार होऊच शकत नाही.त्यांना सोबत घेण्याची आणि त्यांचे मन वळवण्याची सुचना ना.रामदास आठवले यांनी जे.पी.नड्डा यांना केली

.जे.पी.नड्डा आणि ना.रामदास आठवले यांच्या मध्ये महाराष्ट्र सरकारच्या शपथ विधी बाबतही चर्चा झाली.रिपब्लिकन पक्षाने भापज महायुतीला चांगली साथ दिली आहे.त्यामुळे महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला ही एक कॅबिनेट मंत्री पद आणि एक एम एल सी देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणविस यांनी रिपब्लिकन पक्षाला दिलेले आहे.तसेच महाराष्ट्राचे भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही रिपब्लिकन पक्षाला एक मंत्री पद आणि एक एम.एल.सी देण्याचे आश्वासन दिलेले आहे.
त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणुन जे.पि नड्डा यांनी रिपब्लिकन पक्षाला एक मंत्री पद आणि एक एम.एल.सी देण्याबाबत लक्ष देण्याची सुचना ना.रामदास आठवले यांनी केली .त्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पि.नड्डा यांनी महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्री पद मिळेल यासाठी आपण लक्ष देऊ असे आश्वासन जे पी नद्दा यांनी ना.रामदास आठवले यांना दिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *