(मुंबई / प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची तिसऱ्यांदा निवड झाली. याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांनी श्री. फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. मुंबईमध्ये विधानभवनात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आमदार श्री. मुश्रीफ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
शुभेच्छा देताना आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून आपल्या नेतृत्वाखाली येत्या पाच वर्षात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होवो. महाराष्ट्र राज्य अतिशय मोठी प्रगती करो.