म्हाकवे (ता. कागल) येथील श्रीपती ज्ञानू पाटील यांच्या दोन गाई विद्युत पंख्याचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला आहे, यामुळे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे पाटील कुटुंबाला आर्थिक झळ बसली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी श्रीपती ज्ञानू पाटील यांचा गाईंचा गोठा ओढ्याजवळ आहे. उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून गोठ्यामध्ये सिलिंग फॅनची सोय करण्यात आली आहे . आज दुपारी बारा वाजता ते वैरण टाकून घरी आले होते. दरम्यानच्या काळात पंखा सुरू होता हा पंखा जळून त्याचा शॉक लोखंडी अँगल मध्ये उतरल्यामुळे दोन गाईंचा जागीच मृत्यू झाला. या दोन गाईंची किंमत अंदाजे दीड लाख रुपये असून पाटील यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे .
पाटील यांच्या एकूण तीन गाई त्या गोठ्यामध्ये होत्या परंतु दोन गाईंच्या मध्ये लोखंडी खांब होते पंख्याचा विद्युत प्रवाह लोखंडी खांबात उतरल्यामुळे त्या दोन गाईंना शॉक बसला एका गाईच्या बाजूला लाकडी खांब होता त्या गाईला मात्र विद्युत शॉक बसलेला नाही मृत्यूमुखी पडलेल्या गाईंचा पंचनामा करण्यात आला आहे