(करवीर/ प्रतिनिधी – सिध्दी साळुंखे)
नंदगाव (ता. करवीर) येथील नॅशनल कुस्ती अकॅडमीने कुस्ती क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. एन.आय.एस. प्रशिक्षक कृष्णात कांबळे व तानाजी कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीत प्रशिक्षण घेत असलेल्या कुस्तीपटूंनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
सतेज दळवी ने 45 किलो वजन गटात साई नॅशनल सुवर्णपदक, अनिकेत पाटील ने 48 किलो वजन गटात राज्यस्तरीय सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय पातळीवर निवडमध्ये प्रवेश केला , तर महेश पाटील ने 50 किलो गटात शालेय नॅशनल सिलेक्क्षन ,.l केदार वाडकर 60 किलो वजन गटात शालेय नॅशनल सिलेक्षन मध्ये सहभागी झाला. अतुल मगदूम ने 77 किलो गटात खाशाबा जाधव स्पर्धेत रौप्यपदक जिंकले, विवेक चौगले ने 82 किलो गटात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कास्यपदक मिळवले, सुयश साठे ने 48 किलो गटात राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळवला आणि प्रणिती साठेने 45 किलो गटात शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला.
याशिवाय राजवीर कुंभार आणि शुभम चौगले यांची निवड नागराज मंजुळे यांच्या आगामी मराठी चित्रपटासाठी खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट मध्ये झाली आहे.