निपाणी/ प्रतिनिधी
देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथील राष्ट्रीय सेवा योजना (कनिष्ठ विभाग) यांच्या मार्फत आयोजित ‘विशेष श्रमसंस्कार शिबिर’ अर्जुनी येथे आयोजित केले असून, शिबिर भेट प्रसंगी स्मिता गौड, सहा. शिक्षण संचालिका तथा कार्यक्रम समन्वयक, शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर यांनी आजच्या आधुनिक काळात श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, मूल्यांची जपणूक व्हावी. राष्ट्र उभारण्यात युवकांचा सहभाग महत्त्वाचा असून अशा शिबिरातून स्वयंसेवकांची जडणघडण होत असते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या प्रोफे डॉ जी डी इंगळे यांनी भूषविले. उप प्राचार्या मा. प्रा. एस. पी. जाधव,डॉ. सी. एम. नाईक,इतिहास विभाग प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
अर्जुनी ता. कागल येथे संपन्न होत असलेल्या शिबिरामध्ये ‘किशोरवयीन मुला-मुलींसाठी (अनेमिया) रक्ततपासणी कॅम्पला भेट दिली. हा कॅम्प प्रा. डॉ. वर्षा खुडे, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग,देवचंद कॉलेज येथील प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने घेण्यात आला. सह्याद्री वनराई मध्ये मा. श्रीमती स्मिता गौड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
शिबिर भेट प्रसंगी मा. प्रा. राजेश किरूळकर, जिल्हा समन्वयक, रासेयो, मा. श्री. देवेंद्र भोसले, शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर मा. प्रा. विशाल वैराट, सहा. विभागीय कार्यक्रम अधिकारी आदी मान्यवरानी राष्ट्रीय सेवा योजनेचे आपल्या जीवनातील,स्पर्धा परीक्षेतील यशासाठी महत्त्व आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्या प्रोफे डॉ जी डी इंगळे यांनी, स्वयंसेवकांनी आपल्या व्यक्तिमत्वातील विविध कौशल्य विकास साधण्यासाठी अशा उपक्रमात सहभागी व्हावे. वक्तृत्व, नेतृत्व, स्वयंशिस्त, श्रममूल्य अशा विविध गुण – कौशल्य विकास करण्यासाठी एनएसएस शिबिर उपयुक्त ठरते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही.पी.पाटील यांनी, सूत्रंचालन प्रा.श्रीमती आर. एस. सोकासने, आभार प्रा.बी.एस.कुंभार यांनी मानले. कु. ओंकार कांबळे,कु.सई रानमाळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रा सौ ए. ए. कांबळे, प्रा.विकास माने, प्रा.व्ही एन पाटील,मा प्रा नानासाहेब जामदार, श्री दयानंद आनुसे,श्री विकास कोरे, श्री.सुदाम देसाई , श्री नामदेव चौगुले आदी मान्यवर, रासेयो समिती सदस्य, अर्जुनी ग्रामस्थ व स्वयंसेवक उपस्थित होते.