(तिटवे प्रतिनिधी):
शहीद शिक्षण प्रसारक मंडळाने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय चित्र रंगवणे स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २०० विद्यार्थ्याची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. ही अंतिम स्पर्धा शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवे येथे घेण्यात आली.
स्पर्धेत शिवराज विद्यालय मुरगूड येथील शुभम संपत लोहार प्रथम, न्यू हायस्कुल तारळे येथील विनायक गोरखनाथ कुंभार द्वितीय तर शाहू कुमार भवन कासारवाडाची विद्यार्थिनी सृष्टी सुनील वारके हिने तृतीय क्रमांक पटकवाला. यासोबतच उत्तेजनार्थ वीस पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र व शिल्ड देण्यात येणार आहे.ही स्पर्धा प्राचार्य प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. या संपूर्ण स्पर्धेचे समन्वयन प्रा. अविनाश पालकर यांनी तर आयोजन प्रा. सागर शेटगे व प्रा. दिग्विजय कुंभार यांनी केले.