(सोनाळी/ प्रतिनिधी )
संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांची ईकेवायसी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने स्वतःहून पुढाकार घेत जिल्हा परिषद मतदार संघनिहाय मोहीम राबवली आहे. कागल तालुक्यातील बिद्री बोरवडे मतदार संघातील १७ गावातील सदर योजनेतील लाभार्थ्यांची मोफत ईकेवायसी सुविधा देण्यासाठी महसूल विभाग आणि महा ई सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस उपक्रम राबविला . यामध्ये हजारो लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
सरकारसह आता प्रशासनानेदेखील कंबर कसली असून गावपातळीपर्यंत जावून प्रशासकीय यंत्रणा काम करू लागल्याने संजय गांधी निराधार सह अन्य योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळत आहे. कागल तालुक्यात महसूल विभाग व विनामूल्य महा ई सेवा केंद्रचालक योजनांची जनजागृती करून नागरिकांना सुविधा देत असल्याने लाभार्थी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. यासाठी तहसीलदार अमरदिप वाकडे, नायब तहसीलदार डॉ.अर्चना कुलकर्णी, रुपाली सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमासाठी बिद्री मंडल अधिकारी संभाजी शिंदे, ग्राममहसूल अधिकारी नीलम दळवी, शबाना मुल्ला, नंदकुमार घस्ती, नागोजी मोरे, सचिन जांभळे,माया कुंभार, निता लोहार ,योगिता शिंदे, ग्रामसेवक बी के कांबळे,महा ई सेवा केंद्रचालक समाधान म्हातुगडे, अनिल गोते, अक्षय घोडके, दिगंबर गुरव , सुनिल शेणवी , कृष्णात जांभळे ,सचिन पाटील , दयानंद गुरव , प्रविण पाटील, एम. एम.चौगले, अजिंक्य शिंदे, अरुण धोंड, सुधीर कांबळे, नंदकुमार हिरुगडे, दिगंबर पोवार, युवराज पाटील, सातापा डाफळे, गजानन ढोके यांनी सर्व ऑनलाइन सेटअप लावून योगदान दिले . तर असंख्य लाभार्थीना या उपक्रमाचा लाभ घेतला.
केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला व्हावा यासाठी मागील काही वर्षापासून सरकारसह प्रशासन देखील गतिमान झाले आहे . गावपातळीवर विविध उपक्रम राबवून शासकीय योजनांची जनजागृती केली जात असून गरजू पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळत असल्याने गोरगरीब जनता समाधानी आहे.
— समाधान म्हातुगडे, ग्रामपंचायत सदस्य सोनाळी