मुरगूड/ प्रतिनिधी-जोतीराम कुंभार
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. टी. एम. पाटील हे नुकतेच रुजू झाले . प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील हे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड येथे उपप्राचार्य आणि राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांना एकुण ३२ वर्षांचा शैक्षणिक क्षेत्रातील अध्यापनाचा अनुभव असुन,प्रशासनाचा ही प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या नियुक्ती साठी आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबे तर्फे कळे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई, जय शिवराय एज्युकेशन सोसायटी मुरगुडचे सेक्रेटरी खासदार प्रा. संजय मंडलिक, कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक, कार्यवाह आण्णासो थोरवत व प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. 2024 -25 या शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे31वे अधिवेशन पद्मश्री डॉ.ग.गो. जाधव महाविद्यालय गगनबावडा येथे प्राचार्य डॉ. टी. एम.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. प्राचार्य पदाच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.