बिद्री / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करावीत या कौशल्यामुळे विद्यार्थ्यांना देशात तसेच परदेशात नोकरीच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत .असे प्रतिपादन युनिव्हर्सल कम्प्युटर बिद्रीचे संचालक अभिजीत फराक्टे यांनी केले. ते दूधसाखर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय पाटील होते.
महाराष्ट्र शासनाच्या एम.के.सीएल व सारथी मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांची माहिती अभिजीत फराकटे यांनी दिली. त्यामध्ये बायोडाटा कसा तयार करावा, कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत, संवाद कौशल्य, कृत्रिम बुद्धिमत्ता ,सायबर सिक्युरिटी, एक्सेल या शाखेत कोणकोणत्या संधी आहे व सारथी यासाठी कशी आर्थिक मदत करते याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. एस. एन. कुलकर्णी, यांनी केले ,आभार प्रा. सुनील मिठारी यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ. एस.बी. देसाई, प्रा.एस.ए.गंगावणे, प्रा.डॉ. एस. एच. पाटील, प्रा.डॉ. वैशाली कांबळे, प्रा. सुहानी पाटील यांचे बरोबर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अधीक्षक संजय पाटील सिद्धार्थ पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *