
आशिया कप 2025 मध्ये बुधवारी, 17 सप्टेंबर रोजी UAE ला 41 धावांनी हरवून पाकिस्तानने टॉप 2 मध्ये एंट्री घेतली आहे. या संघाने सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. सध्या या गटात भारत अव्वल आहे. लवकर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना रंगणार आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवले होते. हा पराभव पाक संघाच्या जिव्हारी लागला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर या सामन्यावर बहिष्काराचे सावट दिसून आले. भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतर पाक संघाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले.
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गट अ मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघात आता 21 सप्टेंबर रोजी, रविवारी दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर सामना होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार, रात्री 8 वाजता सुरू होईल. गेल्या रविवारी भारताने आबुधाबीमध्ये पाकिस्तान संघाचा 7 गडी राखून मोठा पराभव केला होता. पाकिस्तान संघ सर्व बाद मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला होता.
आशिया कप 2025 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात पाकिस्तानने यजमान यूएईवर 41 धावांनी मात करत साखळी फेरीतील आपला दुसरा विजय मिळवला आहे. पाकिस्तानने यूएईला 147 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यामुळे यूएई हे विजयी आव्हान पूर्ण करत उलटफेर करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर यूएईला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानने यूएईला 17.4 ओव्हरमध्ये 105 रन्सवर ऑलआऊट केलं. पाकिस्तान या विजयासह बी ग्रुपमधून टीम इंडियानंतर सुपर 4 मध्ये प्रवेश करणारी दुसरी टीम ठरली आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीनंतर सुपर 4 मध्ये लढत होणार आहे.



