सेनापती कापशी येथे शाहू महाराजांच्या प्रचारार्थ जाहिर सभा
(सेनापती कापशी / प्रतिनिधी )
देशात कोठेही गेल्यास कोल्हापूर बरोबर शाहू महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. ते पुसण्याचे काम मंडलिक करत आहेत. मागच्या निवडणूकीत कोणाला तरी पाडायसाठी आम्ही मदत केल्याचे कृतघ्न मंडलिक सांगत आहेत . त्यावेळी मी व्यसपीठावर न येता खाली बसून करेक्ट कार्यक्रम केला होता. आता मी व्यासपीठावर आहे. त्यामुळे मंडलिकांचे 3 लाखाचे लिड जावून शाहू महाराज 5 लाख मतानी निवडून येतील.माझ्यासारख्या एवढी मदत करणा-याला मंडलिक जाहिर सभातून बोलत आहेत. 2019 च्या निवडणूकीत मदतीसाठी शाहू महाराजांच्या पाया पडणा-या मंडलिकां इतका कृतघ्न माणूस मी आयुष्यात बघितला नाही अशा कृतघ्न मंडलिकांचा करेक्ट कार्यक्रम करा असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
ते कापशी ता.कागल येथे महाविकास इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच श्रद्धा कोळी उपस्थित होत्या.
सतेज पाटील पुढे,म्हणाले, संजय घाटगेंमुळे कागल तालुक्यातून परिवर्तनाची लाट आहे. खरं तर मागील पाच वर्षात आम्ही केलेल्या चुकीचे प्रायश्चित भोगत आहोत. आम्ही लागण करून चुक केली आता खोडव काडून टाकायची वेळ आली आहे. शिव शाहूंच्या विचारांची लागण करण्याची हिच वेळ आहे. या राहिलेल्या 14 दिवसात अनेक अफवा पसरवल्य़ा जातील त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
संजय घाटगे म्हणाले, छ.शाहू महाराज हे नुसते गादीचे वारसदार नसून राजर्षी शाहूंच्या विचारांचे वारसदार आहेत. एक चारित्र संपन्न समाजाभिमुख उमेदवार एका बाजूला उभा असताना कागल तालुक्यातून आपल्यालाच दिड लाखाचे लिड मिळेल अशी दिवा स्वप्न कांहीजन बघत आहेत. परंतू निकाल आल्यावर शाहू महाराजांचे कागल मधील लिड पाहून त्यांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. देशात अबकी बार 400 पार चा नारा देवून भारत महासत्ता बनवतो म्हणून कांहीजन छाती बडवून घेत आहेत. परंतू 56 टक्के लोक 28 वर्षे वयाचे असल्याने येत्या दोन वर्षात भारत महासत्ता बननारच आहे. तळागाळापर्यंत मोठ मोठी धरण ,सेवा संस्था किती बंधारे ,जिल्हा बॅंका,दुध संघ,दुध संस्था ,विहीरी ,घरे हे सगळं काँग्रेस ने पोहचविलेले आहे आणि आता आयत्या पीठावर रांगोळ्या ओढून यांनी जीएसटी ने माणस डबघाईला आणली आहेत समाज उद्धवस्त होत आहे त्य़ामुळे अब की बार मोदी हद्दपार हाच नारा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
अंबरीश घाटगे म्हणाले, शेतकरी आंदोलन असो कि मराठा आंदोलन शाहू महाराजानी तत्परतेने त्या ठिकाणी पोहचून त्याठिकाणी प्रश्न मार्गी लावले आहेत. य़ा उलट विद्यमान खासदारांचे काम दाखवा शाहू महाराजांनी प्रयाग चिखली परिसरात 90 एकर जमिन मोफत दिली आहे. इतरांनी 1 गुंठा दिल्याचे दाखवा. त्यामुळे मुश्रीफांनी आता सावध रहायला हवे कारण त्यांच्या तंबूत आलेला हा उंट त्यांचा तंबूच घेवून जाण्याची भिती आहे. मागच्या वेळेला सतेज पाटलांनी निवडून आल्यावर मंडलिकांना मिस्टर इंडिया चित्रपटातील घड्याळ दिले होते काय कारण ते गायबच असतात असे म्हणताच कार्यक्रमात हाशा पिकला.
शाहू महाराज म्हणाले,शिवरायांची स्फुर्ती घेऊन ‘अन्याया विरुद्ध लढा’ हा शिवरायांचा विचार आपण जपतो.सद्यस्थितीत देश अडचणीत आहे.संविधान वाचवण्यासाठी,राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार पुढे नेण्यासाठी आपल्याला अन्याया विरुद्ध लढा दिला पाहिजे. सद्या मोदी सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवत आहे. यासाठीशेतकऱ्यांना केंद्र बिंदू ठेवून कार्य करण्यासाठी मी उमेदवारी स्वीकारली आहे.
कोल्हापूरच्या माजी महापौर भारती पवार म्हणाल्या, 1985 पासून आजपर्यंत मी मंडलिकांच्या एक कप चहात सुद्धा मिंधि नाही आणि शिंदे च्या खोक्यावर जगण्याची आमची औलाद नाही शाहूंचे ऋण फेडण्यासाठी आम्ही सक्रीय आहोत परंतू स्वताचे कर्तुत्व नसणा-यांनी आमच्यावर बोलू नये. यावेळी दयानंद पाटील यांनी शाहू महाराज यांना पाठिंबा जाहिर केला.
याप्रसंगी ,शिवानंद माळी,दत्तोपंत वालावलकर,शिवानी मोहन मोरे,शिवाजी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी उदयबाबा घोरपडे,मालोजी राणोजी,घोरपडे,धनराज घाटगे,बिद्री संचालक रणजित मुडुकशिवाले ,संभाजी भोकरे,महेश देशपांडे,चंदाराणी पाटील,अबोली कांबळे,रवी कांबळे,चंद्रकांत माळी सागर कोंडेकर,तानाजी पाटील,डी बी कांबळे आदी मान्यवरांसह कापशी परिसरातील तमाम कार्यकर्ते उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक धनाजी सेनापतीकर तर आभार उदय पवार यांनी मानले.
लहान भाऊ म्हणून घाटगें बरोबर…
सतेज पाटील म्हणाले, मला सर्वजन कागल मध्ये लक्ष घाला असे सांगत होते. परंतू संजय घाटगेंनी विराट कोली सारखे कॅंग्रेससाठी काम केले आहे. त्यांचे हे काम मी आयुष्यभर विसरणार नाही. ज्या वेळी या लोकसभेचा इतिहास लिहीला जाईल त्यावेळी संजय घाटगे यांचे नाव सर्वात वरती असेल त्यामुळे येथून पुढे संजय घाटगेंचा लहान भाऊ या नात्यानं त्यांना लागेल ती आणि तादक मदत येथून पुढच्या काळात देवू.
शिमगा आणि दिवाळी….
अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, गेली महिनाभर मी खासदार मंडलिकांनी कुणाचा फोन उचलल्याचे दाखवा आणि 10 हजाराचे बक्षीस मिळवा असे सांगत असताना एकही माणूस पुढं आलेला नाही. नॉटरीचेबल खासदारांच्या घरात ज्या वेळी दिवाळी असते त्यावेळी कामगारांच्या घरात शिमगा असतो या वरून तुम्ही काय समजायचं ते समजा असा टोला त्यांनी लगावला.
विरेंद्र ची लायकी काय….
दत्ता घाटगे म्हणाले, विरेंद्र मंडलिक हे शाहू महारांजावर बेच्छूट आरोप करत आहेत विरेंद्र तुझं वय किती,ज्ञान किती, लायकी किती देणं ना घेणं माझ बाजीराव नाणं अशी यांची आवस्था आहे.