December 22, 2024


तिटवे / प्रतिनिधी

 येथील शहीद पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व सिनियर केजी मधून पहिलीच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ पार पडला. अंगणवाडीतून पहिलीच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी दीक्षांत समारंभ हा एक अनोखा उपक्रम होता. आपली मुलं शाळेला जायला लागली की शाळेच्या पहिल्या दिवसापासून आपण शाळेतील एका खास क्षणाची वाट पाहत असतो; तो क्षण म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात गॅदरिंग. यामध्ये विद्यार्थ्यांनी एकूण बावीसहून अधिक परफॉर्मन्स सादर केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मबाई सीताराम पाटील व शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रशांत पालकर विशेष उपस्थित होते. 

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर पाठबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. स्मिता माने व दुधसाखर ज्युनिअर कॉलेज बिद्रीचे प्राध्यापक विनय कुलकर्णी उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांना प्रा. कुलकर्णी व सौ. माने यांनी मार्गदर्शन केले. प्रा. कुलकर्णी यांनी श्री राम व शबरीच्या गोष्टीतून सध्याच्या जगात आपण फक्त यशस्वी नाही तर एक चांगला नागरिक ही होणं गरजेचं आहे हे सांगितले. जीवनात श्री रामांनी शबरी ला सांगितलेली सहा तत्वे पाळली तर आपण एक चांगली व्यक्ती बनू शकतो असं ते म्हणाले. सौ माने पाण्याचे महत्व या विषयी बोलल्या. तसेच डॉ. जगन्नाथ पाटील यांनी खूप चांगल्या संकल्पनेतून या शिक्षण संस्थेची स्थापना केली व ग्रामीण भागातील विदर्थ्यांना खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे, याबद्दल कौतुक केले.

शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी शहीद संस्थेचा इतिहास व उद्दिष्ट सांगितले. स्कूल चा वार्षिक शैक्षणिक अहवाल वाचन स्कूलचे व्यवस्थापक श्री. संतोष चौगले यांनी केले. यामध्ये वर्षभरात घेतलेल्या सर्व ॲक्टिव्हिटी व सिलॅबस ओरिएंटेड काही प्रोजेक्ट्स, क्षेत्रभेटी यांचा आढावा घेतला.
या स्नेसंमेलनामध्ये मराठमोळी, पंजाबी, कोळी, तमिळ, धनगर अशा अनेक गाण्यांवर विद्यार्थी थिरकले. तसेच वर्षभरात घेतलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या विजेत्यांना पैठणी व बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2023 – 24 चा बेस्ट स्टूडेंट ऑफ द इयर आणि बेस्ट टीचर ऑफ द इयर हे दोन पुरस्कार अनुक्रमे इ. २ री ची विद्यार्थिनी कु. प्रगती रमेश पाटील व शहीद पब्लिक स्कूलच्या सहशिक्षिका कु. विद्या पुंडलिक पाटील यांना मिळाला.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा पाटील व शिल्पा पाटील यांनी केले. आभार कृष्णात कांबळे यांनी मानले.

या वेळी संस्थेचे खाजनिस अनिल पाटील, सचिव दिलीप देसाई, शहीद महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागाचे विभागप्रमुख दिग्विजय कुंभार , संगणक विभागाचे विभागप्रमुख सागर शेडगे, तसेच विनायक पाटील, वैभव कुंभार, स्कूलच्या प्रभारी प्राचार्या ऐश्वर्या शिवाजी कवडे, उप प्राचार्य अनिल भांडवले, कल्चरल विभागाच्या विभागप्रमुख कोमल चव्हाण, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *