मळगे बुद्रुक/प्रतिनिधी
खासदार संजय मंडलिक यांनी प्रचंड कामे केली परंतु जाहिराती केल्या नाहीत हि त्यांची चूक झाली आहे . काम करणारा माणूस जाणीवपूर्वक राजकारणासाठी दुर्लक्षित केला जात आहे .आपल्याला मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजय मंडलिक यांनाच निवडून देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राजे बँकेचे चेअरमन एम.पी. पाटील यांनी केले.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मळगे बुद्रुक तालुका कागल येथे राजे समरजितसिंह घाटगे व मंडलिक गटाच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये राजे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाहू सहकारी कारखान्याचे संचालक डॉ. डी एस पाटील, सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या माजी संचालिका सौ. राजश्री बाळासाहेब चौगुले, भगवान पाटील, शेखर सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक प्राध्यापक सुनील मगदूम नामदेव हावलदार, कृष्णात पाटील,तानाजी पाटील, संदीप गोते, विलास कमळकर, शिवाजी अस्वले यासह असंख्य कार्यकर्ते हजर होते.
स्वागत मळगे बुद्रुकचे उपसरपंच दिगंबर अस्वल यांनी केले. आभार सागर कमळकर यांनी मानले.